नेमळे विद्यालयातील तीन विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड
नेमळे विद्यालयातील तीन विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड
सावंतवाडी
जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा कार्यालय सिंधुदुर्ग आयोजित क्रीडा संकुल. ओरोस येथे झालेल्या जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेत नेमळे पंचक्रोशी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील तीन विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेत १४ वर्षाखालील मुलांच्या गटात पांडुरंग संताजी पाटकर या विद्यार्थ्यांने २५.५६ मीटर थाळी फेकून जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला. या विद्यार्थ्यांने ९.४४ मीटर गोळा फेकून याही स्पर्धेत प्रथम आला. १७ वर्षाखालील ७३ किलो वजन गटात वेटलिफ्टिंग स्पर्धेत १०० किलो वजन उचलून रोहन रामचंद्र गावडे जिल्ह्यात प्रथम आला. १७ वर्षाखालील मुलींच्या गटात आर्या आप्पा कापडी हिने १५०० मीटर धावणेमध्ये द्वितीय क्रमांक प्राप्त केला. ८०० मीटर धावणेमध्ये निधी धुरी हिने तृतीय क्रमांक पटकावला. या विद्यार्थ्यांची सांगली येथे होणाऱ्या विभागीय मैदानी स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल नेमळे पंचक्रोशी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आ. भि. राऊळ, संस्थेचे सर्व पदाधिकारी, संचालक प्राचार्या कल्पना बोवलेकर, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक क्रीडाशिक्षक आर. के. राठोड यांचे अभिनंदन केले.
