फोंडाघाटला बिबट्याच्या मुक्त संचारामुळे भीती
फोंडाघाटला बिबट्याच्या मुक्त संचारामुळे भीती
फोंडाघाट
मागील पंधरा दिवसापासून फोंडाघाट येथे मानवी वस्तीमध्ये बिबट्याचा मुक्तसंचार सुरू आहे. काही ठिकाणी पाळीव जनावरे मारल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मात्र, वनविभागाकडून कोणतीही उपाययोजना होत नसल्याने संताप व्यक्त होत आहे. वनविभागाकडून कार्यवाही न झाल्यास फोंडाघाट वनविभाग कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे. फोंडाघाट-हवेलीनगर येथे दुचाकीस्वारासमोर बिबट्याने उडी मारली. नंतर लाईटच्या प्रकाशात हळूहळू चालणारा बिबट्या नाहिसा झाला. ही बाब रस्त्याच्या बाजूला राहणाऱ्या कॉन्ट्रॅक्टर भाई गुरव यांना त्यांनी सांगितली. गुरव यांच्या घराच्या सीसीटीव्हीमध्येही मागील बाजूस बिबट्या फिरत असल्याचे दिसून आले. त्यांनी वनविभागाचे वनपाल कोळेकर व वनरक्षक पाटील यांना याबद्दल माहिती दिली. त्यांनी शोधाशोध करेपर्यंत बिबट्या पसार झाला होता. काही दिवसापूर्वी बिबट्याचे पिल्लू मृत अवस्थेत कोंड्ये रस्त्यादरम्यान सापडले होते. त्याची वनविभागाने रितसर विल्हेवाट लावली. मात्र, पुन्हा एकदा कोंडये- हवेलीनगर सीमेवर सायंकाळी खडकावर बसलेला बिबट्या एका वाटसरूला आढळून आला. फोंडाघाट धनगरवाडा येथील शेळीपालन व्यवसाय करणारे राजू पाटील यांच्या शेळ्या चरत असताना बिबट्याने त्यांच्यावर उडी मारली. मात्र, राजू पाटील यांनी प्रसंगावधान राखून आपल्या हातातील दांड्याच्या सहाय्याने बिबट्याला हुसकावून लावले होते. १२ ऑक्टोबरला वाघेरी
शेतकऱ्याचे येथील वासरू बिबट्याने
मारल्याची घटना घडली.

