सावंतवाडीत युवकाला मारहाण, सहाजणांविरोधात गुन्हा दाखल
सावंतवाडीत युवकाला मारहाण, सहाजणांविरोधात गुन्हा दाखल
सावंतवाडी
शहरातील मच्छीमार्केट तिठ्याजवळ किरकोळ कारणाच्या वादातून झालेल्या मारहाण व धक्काबुक्कीत एकजण जखमी झाला. साईश प्रताप निर्गुण (२५, रा. सालईवाडा सावंतवाडी) असे जखमीचे नाव आहे. साईश निर्गुण यांनी दिलेल्या तक्रारीनुसार अथर्व विनय जगताप याच्यासह सहाजणांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना १५ ऑक्टोबरला रात्री १२ वाजण्याच्या सुमारास घडला होता. साईश निर्गुण याने पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, तो दुकानात पाण्याची बाटली घेण्यासाठी गेलाअसता संशयित अथर्व जगताप याने तो आपल्याबद्दल काहीतरी बोलत आहे, असा गैरसमज करून घेऊन ‘तू कोणाला शहाणपणा शिकवतोस?’, असे विचारत शिवीगाळ केली व डोळे फोडून टाकण्याची धमकी दिली. त्याचवेळी कोणीतरी हत्याराने डोळ्यावर मारून दुखापत केली. त्यावेळी अथर्व याच्यासोबत असलेले विनय जगताप, करण जगताप, प्रांजल जगताप, दुर्गेश सावंत, आर्यन जगताप (सर्व रा. सावंतवाडी) यांनी जमाव करून मारहाण करून दुखापत केली. त्यानुसार सहाजणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

