माडखोल येथे आज फुगडीचा जंगी सामना
माडखोल येथे आज फुगडीचा जंगी सामना
ओटवणे
माडखोल ग्रामदैवत श्री पावणाई रवळनाथ मंदिरात दसरा उत्सव निमित्त शुक्रवारी २० ऑक्टोबरला रात्री ८.३० वाजता आमने-सामने फुगडीच्या जंगी २०×२० सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे. खाजणादेवी फुगडी मंडळ आसोली आणि भैरव जोगेश्वरी फुगडी मंडळ (कुडाळ) यांच्यात हा आमने-सामने फुगडीचा जंगी सामना होणार आहे कार्यक्रमाचे लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

