सावंतवाडीत सफाई कर्मचाऱ्यांचे पुन्हा ‘काम बंद’
सावंतवाडीत सफाई कर्मचाऱ्यांचे पुन्हा ‘काम बंद’
पगाराचे आश्वासन फोल : आधी पगार, मगच सफाई!
सावंतवाडी
सावंतवाडी नगरपालिकेच्या कंत्राटी कामगारांचा पगाराचा प्रश्न अद्यापही अधांतरीच आहे. गेल्या महिन्यात या सर्व कर्मचाऱ्यांनी आंदोलन छेडले. त्यावेळी त्यांना आश्वासन देण्यात आले. मात्र, या महिन्याचा त्यांना पगार अद्याप दिलेला नाही. त्यामुळे बुधवारी सकाळपासून ५५ सफाई कंत्राटी कामगारांनी नगरपालिकेच्या आवारात ‘काम बंद’ आंदोलन पुकारले. आमचा पगार कधी मिळणार? एरव्ही इतर कर्मचाऱ्यांचे पगार वेळेत होतात. आमचे वेळेत का होत नाहीत? आम्ही असंच जगायचं का, असे अनेक सवाल त्यांनी उपस्थित केले आहेत.
गेल्या महिन्यात जेव्हा या सफाई कामगारांनी आंदोलन छेडले, तेव्हा सर्व राजकीय पुढाऱ्यांनी त्यांना पाठिंबा दिला. मात्र, त्यानंतर पुन्हा प्रकरण थंडावले. पालिकेचे कर्मचारी
आम्हाला या महिन्यात तरी वेळेवर पगार मिळेल, या आशेवर होते. १८ तारीख आली तरीही पगार झालेला नाही. त्यामुळे सर्व ५५ सफाई कामगारांनी सकाळपासूनच काम बंद’ आंदोलन सायंकाळपर्यंत पालिकेच्या सुरू केले. आवारात बसून होते. या सफाई कामगारांकडे कोणी फिरकूनही पाहिले नाही. त्यामुळे ते संताप व्यक्त करत होते. या सफाई कामगारांना पालिकेचे अधिकारी ‘तुम्ही काम सुरू करा. आम्ही पगाराचं बघतो’, एवढेच सांगत आहेत. त्यामुळे आता आम्ही पगार मिळत नाही तोपर्यंत शहरातील साफसफाई करणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. पालिकेच्या सफाई कामगारांनी ‘काम बंद’ आंदोलन सुरू केल्याने सावंतवाडी शहरातील सफाई थांबली होती. सफाई कामगारांचे पगार थकण्यास कंत्राटदार जबाबदार आहे, असे सांगण्यात आले.