‘त्या’ तीन ग्रा. पं. साठी अद्याप तीनच अर्ज
‘त्या’ तीन ग्रा. पं. साठी अद्याप तीनच अर्ज
दोडामार्ग
दोडामार्ग तालुक्यातील तीन ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी एकूण तीन नामनिर्देशनपत्र दाखल केले आहेत. यात सरपंच पदासाठी एक व सदस्य पदासाठी दोन उमेदवारांनी नामनिर्देशन दाखल केल्याची माहिती तहसील कार्यालयातून देण्यात आली.
दोडामार्ग तालुक्यातील तीन ग्रामपंचायतींसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. यात मुदतबाह्य झालेल्या साटेली-भेडशी, कुडासे खुर्द (पाल पुनर्वसन) आणि बोडण (शिरंग पुनर्वसन) या तीन ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार
आहेत.
साटेली-भेडशी ग्रामपंचायतीचे सरपंच पद खुला प्रवर्ग महिलांसाठी, कुडासे खुर्दचे सरपंच पद खुला प्रवर्ग महिलांसाठी व बोडण ग्रा.पं.चे अनुसुचित जातीसाठी आरक्षित झाले आहे. येथील तहसील कार्यालयात सोमवारपासून नामनिर्देशनपत्र दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. साटेली-भेडशी ग्रामपंचायतीसाठी बुधवारी एकूण तीन नामनिर्देशनपत्र दाखल करण्यात आली. कुडासे खुर्द व बोडण ग्रामपंचायतीसाठी अद्याप एकही नामनिर्देशनपत्र दाखल करण्यात आले नाही.

