कोकणक्राइममहाराष्ट्रमालवण

पेट्रोल पंपासाठी कागदपत्रांचा गैरवापर केल्याची तक्रार

पेट्रोल पंपासाठी कागदपत्रांचा गैरवापर केल्याची तक्रार

मालवण

पेट्रोल पंपाच्या मान्यतेसाठी आपल्याकडील कागदपत्रांचा गैरवापर झाल्याची तक्रार खालची देवली येथील क्रिकेट समालोचक प्रदीप अनंत देऊलकर यांनी पोलिसात केली आहे.

तक्रारदार देऊलकर यांनी सीएमईजीपी या योजनेतंर्गत ऑटोरिक्षाचे कर्ज प्रकरण करण्यासाठी आवश्यक त्या कागदपत्रांची पीडीएफ फाईल ४ ऑगस्ट रोजी एका व्यक्तीस मोबाईलवरून पाठवली होती. परंतु त्यांचे हे कर्जप्रकरण सीएमईजीपी या योजनेत मंजूर होऊ शकले नाही. त्यानंतर सदर व्यक्तीने देऊलकर यांच्याशी मोबाईलवर संपर्क करून तुम्हाला अमुक एवढी रक्कम

देतो. तुमच्या नावाने पेट्रोल पंपाचा प्रस्ताव करुया, असे सांगितले. मात्र यावर देऊलकर यांनी नकार दिला. १७ ऑक्टोबर रोजी देऊलकर स्वतः मागासवर्गीय नागरिकांसाठी पेट्रोल पंप योजनेतंर्गत ऑनलाईन प्रस्ताव सादर करायला गेले असता त्यांच्या नावाने अगोदरच एक अर्ज सादर असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. सदर सवलतीमधील पेट्रोल पंपाचा अर्ज २० वर्षांच्या करारावर होता. आपल्या परवानगीशिवाय संबंधित व्यक्तीने हा प्रस्ताव सादर करीत आपली फसवणूक केल्याची तक्रार बुधवारी त्यांनी पोलिसात दिली.

फसवणूक करणाऱ्यांवर कारवाईची मागणी आपल्या परवानगीशिवाय पेट्रोल आहे.

पंपासाठी अर्ज सादर केल्याप्रकरणी संबंधित व्यक्तींवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी देऊलकर यांनी पोलिसांकडे केली आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख १७ ऑक्टोबर होती. मात्र झालेल्या फसवणुकीमुळे आपल्याला समस्या निर्माण होऊ शकते. पोलिसांनी याप्रकरणाची सखोल चौकशी करून आपणास न्याय द्यावा. सदर सवलतीमधील पेट्रोल पंप वीस वर्षांच्या करारावर होता. जर मी स्वत: सादर केलेला प्रस्ताव मंजूर झाला असता, तर मी वीस वर्षांत एक चांगला व्यावसायिक बनू शकलो असतो, असे देऊलकर यांनी आपल्या तक्रार अर्जात म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!