कुडाळकोकणमहाराष्ट्रराजकीय

विनायक राऊत यांचा २१ रोजी सत्कार

विनायक राऊत यांचा २१ रोजी सत्कार

कुडाळ

खासदार विनायक राऊत यांची शिवसेना ठाकरे गटाच्या नेतेपदी निवड झाल्याबद्दल आमदार वैभव नाईक यांच्यावतीने सत्कार सोहळा २१ ऑक्टोबरला सकाळी ११ वा. येथील महालक्ष्मी सभागृहात आयोजित केला आहे. तसेच जान्हवी सावंत यांची उपनेतेपदी निवड झाल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात येणार आहे. जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दूधवडकर, उपनेते गौरीशंकर खोत, जिल्हा समन्वयक प्रदीप बोरकर, जिल्हाप्रमुख संदेश पारकर,

जिल्हाप्रमुख संजय पडते, जिल्हा बँक माजी अध्यक्ष सतीश सावंत, कणकवली विधानसभा मतदारसंघ संपर्कप्रमुख अतुल रावराणे, महिला जिल्हाप्रमुख जान्हवी सावंत, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, बाळा भिसे, संग्राम प्रभूगावकर, युवती सेना समन्वयक शिल्पा खोत उपस्थित राहणार आहेत. यावेळी उपस्थित राहवे, असे आवाहन उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत व तालुकाप्रमुख राजन नाईक यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!