आशा, गटप्रवर्तक महिला बेमुदत संपावर
आशा, गटप्रवर्तक महिला बेमुदत संपावर
ओरोस
‘आशा’ व गटप्रवर्तक महिलांना दरमहा २६ हजार रुपये किमान वेतन द्या. त्याच बरोबर गटप्रवर्तक महिलांना दरमहा ८४५० रुपये स्वतंत्र प्रवास भत्ता द्या. ऑनलाईनचे सक्तीने काम देणे बंद करा. दिवाळीपूर्वी सर्व आशा व गटप्रवर्तक महिलांना किमान पाच हजार रुपये भाऊबीज द्या, आदी मागण्या पूर्ण करून घेण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आयटक संघटना प्रणित आशा व गटप्रवर्तक महिला १८ ऑक्टोबर पासून बेमुदत संपावर गेल्या आहेत.
शंकर पुजारी यांच्या अध्यक्षतेखालील महाराष्ट्र ‘आशा’ गटप्रवर्तक व आरोग्य कर्मचारी संघटना ‘आयटक’ने ‘आशा’ व गटप्रवर्तकांना बेमुदत संपाची हाक दिली आहे. त्यानुसार जिल्हातील “आशा” व गटप्रवर्तक संपात उतरले आहेत. शंकर पुजारी यांच्या नेतृत्वाखाली एकत्र येत त्यांनी याबाबतचे निवेदन जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी • किशोर काळे यांच्याकडे दिले. संप
मागण्या…
■ दरमहा किमान २६ हजार वेतन द्या!
◼️पाच हजार भाऊबीज भेट हवीं!
सुरू झाल्याची दखल घेऊन निवेदन महाराष्ट्र शासनाकडे पाठवून देण्यात येईल, असे उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सांगितल्याची माहिती शंकर पुजारे यांनी दिली. दरम्यान, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी यांची भेट घेण्यात आली. दिवाळीला एक हजार रुपये भाऊबीज देण्यात येईल. याबाबतचा प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे पाठविण्यात आल्याचे डॉ. धुरी यांनी सांगितले. जोपर्यंत प्रमुख मागण्या मान्य होणार नाहीत, तोपर्यंत महाराष्ट्रातील संप मागे घेण्यात येणार नाही, असे शंकर पुजारी यांनी स्पष्ट केले. यावेळी मृण्मयी धोलम, तृप्ती देसाई, अनुष्का गोरम, सोनल नारंगीकर, मोनिका डॉन्टस, अनुराधा पाडावे, पूजा परब, प्रतिमा डुंबरे, वैष्णवी परब, अंकिता गावडे आदी उपस्थित होते.

