अनधिकृत बांधकामप्रकरणी पोलिसांत तक्रार
अनधिकृत बांधकामप्रकरणी पोलिसांत तक्रार
सावंतवाडी
शहरातील सबनीसवाडा भागात इमारतीचे वाढीव अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी सावंतवाडी नगरपालिकेने तेथील जॉन ‘अर्जुन फेराव (रा. जिमखाना परिसर) यांच्या विरोधात सावंतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. ही तक्रार नगर परिषदेचे लिपिक व सर्वेअर नरहरी पिंगुळकर यांनी मंगळवारी सावंतवाडी पोलीस ठाण्यात दाखल केली.
