नवरात्रोत्सवानिमित्त आकेरी येथे विविध कार्यक्रम
नवरात्रोत्सवानिमित्त आकेरी येथे विविध कार्यक्रम
सावंतवाडी
आकेरी-घाडीवाडी येथील श्री महालक्ष्मी उत्कर्ष कला, क्रीडा मंडळातर्फे दरवर्षीप्रमाणे १५ ते २४ आक्टोबरपर्यंत नवरोत्सवानिमित्त धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमांना रविवारपासून सुरुवात झाली आहे. त्रिनवरात्रोत्सवानिमित्त श्री दुर्गामातेचे पूजन करण्यात आले. तसेच विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. १८ ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजता हेळेश्वर दशावतार नाट्यमंडळाचा नाट्यप्रयोग, १९ रोजी रात्री ८ वाजता दांडिया नृत्य, वेंगुर्ला, रात्री ९ वाजता रेकॉर्ड डान्स स्पर्धा, २० रोजी रात्री ८ वा. बाळकृष्ण गोरे दशावतार नाट्य मंडळाचा नाट्यप्रयोग, २१ रोजी रात्री ८ वाजता भजन, २२ रोजी सायंकाळी ७.३० वाजता सावंत बागवेवाडीचे फुगडी नृत्य, रात्री ८.३० वा. दांडिया नृत्य, होडावडे रात्री ९.३० वाजता दांडिया नृत्य, वेंगुर्ला- दाबोसवाडा, २३ ऑक्टोबर – सकाळी १० वाजता श्री सत्यनारायण महापूजा, सायं. ७.३० वाजता १० ७ वी व १२ वी गुणवंत विद्यार्थ्यांचा व मान्यवरांचा सत्काराचा कार्यक्रम. रात्री ८.३० वा. वावळेश्वर दशावतार नाट्यमंडळ तेंडोली यांचा नाट्यप्रयोग, २४ रोजी देवीला नवसाची गाऱ्हाणी व त्यानंतर ढोल नताशांच्या गजरात भव्य मिरवणुकीने देवीचे विसर्जन होणार आहे. कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन श्री. महालक्ष्मी उत्कर्ष कला, क्रीडा मंडळ आकेरी, घाडीवाडी यांनी केले आहे.

