मातोंड येथे आज डबलबारी भजन सामना
मातोंड येथे आज डबलबारी भजन सामना
न्हावेली
मातोंड-पेंडुर येथे देवस्थान कमिटी व श्री श्री देवी सातेरी युवक कला क्रीडा मंडळ, मातोंड यांच्या संयुक्त विद्यमाने १८ रोजी डबलबारी भजन सामना होणार आहे. रात्री आठ वाजता श्री सातेरी मंदिरात श्री वडचीदेवी प्रासादिक भजन मंडळ, लिंगडाळ, 5. देवगडचे बुवा संदीप लोके (पखवाजसाथ योगेश सामंत, तबला संदेश सुता) विरुद्ध हनुमान प्रासादिक भजन मंडळ वर्दे-कुडाळ (पखवाजसाथ जिविराज बावकर, तबला सागर कदम) यांच्यात डबलबारी भजन सामना होणार आहे. उपस्थित राहण्याचे आवाहन मंडळाने केले आहे.

