दारू वाहतूकप्रकरणातील संशयिताला जामीन
दारू वाहतूकप्रकरणातील संशयिताला जामीन
सावंतवाडी
ट्रकमधून सुमारे ७१ लाख रुपये किमतीच्या गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक केल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेला संशयित आरोपी ज्योतीबा परशुराम गावडे (३०, रा. शिवाजीनगर बेळगाव) याला सावंतवाडी न्यायालयाने २५ हजार रुपयांचा सशर्त जामीन मंजूर केला. संशयित आरोपीतर्फे अॅड. परशुराम चव्हाण यांनी काम पाहिले. ही कारवाई ११ ऑक्टोबर रोजी मुंबई- गोवा महामार्गावरील बांदा- खामदेवनाका येथे स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने केली होती. ७१ लाख ५८ हजार रुपये
किमतीची गोवा बनावटीची दारू व १५ लाख किमतीचा ट्रक असा एकूण ८६ लाख ५८ हजार रुपये किमतीच्या मुद्देमालासह ट्रकचालक ज्योतीबा गावडे याला अटक केली होती. त्याला न्यायालयाने एक दिवसाच्या पोलीस कोठडीनंतर न्यायालयीन कोठडी सुनावली होती. संशयित आरोपीचे वकील चव्हाण यांनी आरोपीला जामीन मिळावा, यासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. अर्जाची सुनावणी न्यायालयात होऊन न्यायालयाने संशयित आरोपीला सशर्त जामीन मंजूर केला.

