कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडी

आरोसबाग पूल ते बांदा रस्त्यासाठी एक कोटी मंजूर

आरोसबाग पूल ते बांदा रस्त्यासाठी एक कोटी मंजूर

बांदा

आरोसबाग पूल ते बांदा रस्त्याच्या रखडलेल्या कामासाठी नाबार्डमधून एक कोटी रुपये मंजूर झाले आहेत. या कामासाठी बांदा शहर भाजपच्यावतीने प्रयत्न केले होते. पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून हे काम मंजूर करण्यात आल्याने ग्रामस्थांच्यावतीने त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले. आरोसबाग पुलाचे काम मंजूर झाल्यानंतर पुलाचे काम जलदगतीने पूर्ण करण्यात आले होते. मात्र, बांदा ते आरोसबाग रस्त्याच्या काम मंजूर नसल्याने ग्रामस्थांची गैरसोय होत होती. त्या पाश्वभूमीवर बांदा भाजपच्यावतीने निधी मिळण्यासाठी प्रयत्न केला होता. पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून त्यासाठी एक कोटी निधी मंजूर करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!