राज्य नाट्य स्पर्धा मालवण येथून हलविण्याच्या हालचाली
*🟥राज्य नाट्य स्पर्धा मालवण येथून हलविण्याच्या हालचाली*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 मालवण, दि.१७:* राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेचे प्राथमिक फेरीचे मालवण सिंधुदुर्ग येथील मामा वरेरकर नाट्यगृहात सन २०१८ पासून सुरळीत सुरू असलेले केंद्र जिल्ह्यातील इतर तालुक्यात हलविण्यात येणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. याला मालवणच्या रंगकर्मीचा, बहुतांश नाट्यसंस्थांचा आणि रसिक प्रेक्षकांचा कडाडून विरोध असल्याची माहिती समोर आली आहे. सदरच्या स्पर्धेचे ठिकाणी हलविण्यामध्ये काहींचा हात असल्याचेही बोलले जात आहे. याबाबत शासनाने आपला निर्णय बदलला नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा नाट्यप्रेमींनी दिला आहे. पूर्वी सिंधुदुर्गातील नाट्यसंस्थांना राज्यनाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे जवळचे केंद्र म्हणजे रत्नागिरी होते. या जिल्ह्यातील रंगकर्मींना स्पर्धेतील नाट्यप्रयोग सादर करण्यासाठी १७० ते १८० किलोमीटरचा ५ ते ६ तासांचा प्रवास करून रत्नागिरी गाठावी लागत होती. २०१८ पूर्वीच्या कित्येक वर्षांची होत असलेली गैरसोय मालवणचे रंगकर्मी संजय शिंदे व कुडाळचे रंगकर्मी केदार सामंत यांनी अथक प्रयत्नांनी आणि आमदार वैभव नाईक यांच्या शासन स्तरावरील सकारात्मक प्रयत्नातून हे केंद्र मालवणात आणून दूर केली होती. गेली चार वर्षे ही स्पर्धा मालवणच्या मामा वरेरकर नाट्यगृहात नाट्यसंस्थांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात आणि रसिकांच्या उदंड उपस्थितीत सुरळीतपणे सुरू होती, असे असताना ही स्पर्धा वेंगुर्ला येथे नेण्याचे कारणच काय? हा प्रश्न उपस्थित होत आहे. जिल्ह्यात आणलेली ही स्पर्धा इतरत्र नेण्यापेक्षा शासनाची बालनाट्य किंवा संगीत नाट्यस्पर्धा सुरू करता आली तर प्रयत्न करावा, असे सर्व नाट्यप्रेमी आंदोलनात्मक पवित्र्याच्या तयारीत रंगकर्मीचे म्हणणे आहे. यासाठी काही मुठभर लोक एका राजकीय व्यक्तीला हाताशी धरून राजकारण करण्याचा प्रयत्न करते आहे, ही बाब रंगकर्मी आणि रसिकांच्या पचनी पडलेली नाही. शिवाय इतर तालुक्यातील सदर रंगमंच हे नाट्यगृह नसून ते बहुउद्देशीय सभागृह आहे. रंगमंच लांबी आणि आकाराने खूपच लहान असून रंगमंचाकडे नाटकाच्या सेटची गाडी लागत नाही. त्यासाठी अक्षरश: कसरत करावी लागते. शिवाय सदर सभागृह हे मुख्य शहरापासून ३ ते ४ किलोमीटर लांब वस्ती। नसलेल्या ठिकाणी आहे. त्यामुळे प्रेक्षक वर्ग मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे, असेही नाट्यप्रेमींकडून बोलले जात आहे.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
__________________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards
▫️1BHK -14.38 Lac Onwards
▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards
▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards
🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻♂️*
*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9773815402
9773207862
9561253129
8652678734
*🏫पत्ता :-*
CREADAI SAWANTWADI
टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_
