कृषिकोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

वैयक्तिक शेततळे योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

*🟥वैयक्तिक शेततळे योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन*

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 सिंधुदुर्गनगरी, दि.१७:* मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेंतर्गत ‘वैयक्तिक शेततळे’ ही योजना कृषी विभागामार्फत राबविण्यात येते. या योजनेसाठी शेतकऱ्यांनी अर्ज करावा, असे आवाहन अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री नाईकनवरे यांनी केले आहे. शेततळे योजनेतून संरक्षित सिंचन शेतीला मिळावे, हा योजनेचा मुख्य उद्देश आहे. मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो तेव्हा, ओढे, नाले, नदी इ. द्वारे वाहून जाणारे पाणी उपसून अथवा तलाव, विहीर, बोअर अशा अन्य सिंचन सुविधांमधून पाण्याचा उपसा करून त्याची साठवणूक करण्याकरिता शेतावर शेततळ्यासारखी पायाभूत सुविधा असणे आवश्यक आहे. इच्छुक शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलच्या https://mahadbt. maharashtra.gov. in/Farmer/ Login या संकेतस्थळावर आपले सरकार सेवा केंद्रामार्फत (सीएससी केंद्रमार्फत ) अथवा वैयक्तिकरित्या ऑनलाइन
नोंद करून या योजनेचा लाभ घेता येईल. मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेंतर्गत वैयक्तिक शेततळे घटक राबविण्याकरिता अर्जदार शेतकऱ्यांकडे स्वतःच्या नावावर किमान ०.२० हेक्टर क्षेत्र असणे आवश्यक असून क्षेत्र धारणास कमाल मर्यादा नाही. अर्जदार शेतकऱ्यांनी यापूर्वी मागेल त्याला शेततळे, सामूहिक शेततळे अथवा भात खाचरातील बोडी किंवा इतर कुठल्याही शासकीय योजनेतून शेततळे या घटकाकरिता शासनाच्या अनुदानाचा लाभ घेतलेला नसावा मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत जास्तीत जास्त ३४×३४×३ मीटर व कमीत कमी १५×१५×३ मीटर असे विविध आठ प्रकारच्या आकारमानाचे इनलेट आउटलेट सह किंवा इनलेट आउटलेट विरहित शेततळ्यासाठी खोदकामाच्या परिणामाच्या प्रमाणात कमाल मर्यादा रक्कम 75 हजार रुपये च्या मर्यादेत अनुदान देय राहील योजनेचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

____________________________

 

*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*

*🥳स्वप्नातलं घर ….आवाक्यातला घर🏬 ….एकच नक्षत्र रेसिडेन्सी🥳*

*🎦Kokan Live Breaking||Advertise*

_✨🏃🏼‍♂️🏃🏼‍♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_

*🏬नक्षत्र रेसिडेन्सी🏬*
_सावंतवाडी_

*🏬Ready Possession Flat’s Available*

*🏃🏼‍♂️वेळ दवडू नका आजच आपले हक्काचे घर बुक करा*

*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9422054540
9422075777

*🏫पत्ता :-*
*Nakshtra Residency*
भटवाडी रोड, लक्ष्‍मीनारायण मंदिर,
रॉयल गार्डन शेजारी,सावंतवाडी ४१६५१०

*▪️ऑफिस पत्ता:-*
UG/35,Laxminakshtra Tower
Kudal, Dist. Sindhudurg

———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!