एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढविली तरीही एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून बसले ही किमया विशाल परबच करू शकतो-ना उदय सामंत
युवा उद्योजक विशाल परब यांचा वाढदिवस मान्यवरांच्या उपस्थित उत्साहात साजरा
सावंतवाडी दि१५: ज्यांनी एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवली त्या दोघांना एकाच व्यासपीठावर आणण्याची किमया युवा नेता विशाल परबच करू शकतात आणि ते आज एकमेकांच्या बाजूला बसले आहेत ,विशाल हे तुझ्या वाढदिवसाचे यश आहे अशा शब्दात राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विशाल परब यांना शुभेच्छा दिल्या .असे सांस्कृतिक कार्यक्रम करून ,उपक्रम राबवून मी इथपर्यंत पोहोचलो त्यामुळे तू मेहनत घेत रहा नक्कीच तू यशस्वी होशील होशील अशा शुभेच्छा यावेळी बोलताना उदय सामंत यांनी दिल्या.
परब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज येथील जिमखाना मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या जुबिन नौटीयला यांच्या कार्यक्रमाचे उद्घाटन आज उत्साहात करण्यात आले. यावेळी सामंत बोलत होते.
यावेळी सामंत पुढे म्हणाले, या ठिकाणी परब यांनी उद्योजक म्हणून महाराष्ट्रात चांगली ओळख निर्माण केली आहे. ते युवा लढवय्ये कार्यकर्ते आहेत, त्यामुळे त्यांची युवाईत क्रेझ आहे. त्यांनी आपले सामाजिक काम अशाच पद्धतीने चालू ठेवावे तुमच्या वाढदिवसानिमित्त निमित्याने अनेक मंत्री आले तुम्ही नशीबवान आहात. आमच्या वाढदिवसाला लोकांना बोलवावे लागत होते, मात्र अशाच सांस्कृतिक कार्यक्रमातून मी घडलो आणि आज उद्योगमंत्री म्हणून तुमच्या समोर आहे. तुमचे काम असेच सुरू ठेवा यापुढे त्यांना निश्चितच यश मिळेल, अस विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी मंत्री दीपक केसरकर यांनी विशाल परब यांना शुभेच्छा दिल्या, विशाल यांच्या वडिलांचे व आमचे गेल्या अनेक वर्षापासून चे घरगुती संबंध आहेत ,विशाल हा नाते जपणारा युवक आहे ,त्यामुळे त्याचे सर्वच कार्यक्रम भरगच्च होतात असाच पुढे जा आम्ही तुझ्या सोबत आहोत असा विश्वास यावेळी बोलताना शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिला.
केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक म्हणाले, विशाल आम्हाला समाज सेवकांच्या रूपाने दिसत आहे. याचा आनंद आहे. त्याचा आदर्श आत्ताच्या युवा पिढीने घ्यावा त्याच्या कुटूबांशी माझे अनेक वर्षे संबंध आहेत. त्यांच्या आईवडिलांनी त्यांच्यावर चांगले संस्कार केले आहेत. त्यामुळेच ते ऐवढे यश प्राप्त करू शकलो.
यावेळी प्रभाकर सावंत, राजन तेली आदींनी विशाल यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी महाराष्ट्र राज्य उद्योग मंत्री उदय सामंत, केंद्रीय पर्यटन मंत्री श्रीपाद नाईक, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, माजी आमदार तथा जिल्हाध्यक्ष राजन तेली, जिल्हा सरचिटणीस रणजीत देसाई, जिल्हा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, प्रदेशाध्यक्ष संध्या तेरसे, प्रथमेश तेली, आमदार चंद्रकांत शेटये, अभिनेता दिगंबर नाईक, सुधीर आडिवरेकर, संजय आंग्रे, रवी परब, आनंदी परब, जीतू गावकर, तेजस माने आदी उपस्थित होते..

