कोकणरत्नागिरीराजकीयसामाजिक

मुख्यमंत्र्यांचा कोकण दौरा हा कोकणी जनतेचा अपमान; वैभव खेडेकर

▪️जनतेने नव्या दमाच्या खंद्या मनसे कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : संतोष पिलके

🎴चिपळूण,दि.११: मुख्यमंत्र्यांचा पोफळी चौथा टप्पा दौरा शासकीय नसून खाजगी दौरा होता. फक्त अचानकपणे त्यांनी शासकीय दौरा लावला आणि ते कुणालाही न भेटता निघून गेले. हा कोकणी जनतेचा अपमान आहे. अशी टीका खेड नगरपालिकेचे नगराध्यक्ष व मनसे नेते सरचिटणीस वैभव खेडेकर यांनी केली.

यावेळी त्यांच्या सोबत जिल्हाध्यक्ष विश्वास मुधोळे, चिपळूण तालुकाध्यक्ष संतोष नलावडे, मनविसे तालुकाध्यक्ष अमोल अवेरे, उपतालुकाध्यक्ष अभिनव भुरण, सुनील हळदणकर, विवेक मोरे, विभाग अध्यक्ष रवींद्र जडयाळ, मंगेश शिंदे, शहराध्यक्ष मुबीन गोठे, पिंट्या निवळकर, मनविसे निलेश मोरे, संतोष
हातीसकर, जयेश गुहागरकर, प्रदीप भोसले आदी उपस्थित होते.

चिपळूण मध्ये एका कार्यक्रमानिमित्त ते आले असताना पत्रकारांशी बोलताना ते पुढे म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी प्राधान्य कशाला द्यायचं हे ठरवलं पाहिजे. कोयनेचा चौथा टप्पा हा काही कोकणचा प्राधान्याचा विषय नाही. खरे तर मुख्यमंत्र्यांनी याठिकाणी ज्यावेळी चक्रीवादळ झाले त्यावेळी अश्रू पुसायला यायला हवे होते, कोरोनाचा कहर या कोकणात असताना त्यांनी या कोकणात येऊन आढावा बैठका घ्यायला पाहिजे होत्या. कोकणामध्ये जे काही चौपदरीकरणाचे निकृष्ट दर्जाचे काम सुरू आहे. त्याच्यावर त्यांनी आवाज उठवायला पाहिजे होता. कोकणात बेरोजगारी आहे. याबाबत खरेतर त्यांनी आढावा घ्यायला पाहिजे होता. कोकणात वादळी पाऊस झाला. भातशेतीचे नुकसान झालं याबाबत त्यांनी आढावा घ्यायला पाहिजे होता. परंतु असे न करता कोयनेच्या चौथ्या टप्प्यावर येऊन नुसती पाहणी करून निघून गेले. त्याचा फायदा कुठल्याही कोकणवासीयांना नाही. तिथे काही काल शुभारंभ होता किंवा कुठला कार्यक्रम होता असेही नव्हते.

ज्या कोकणाने शिवसेनेला भरभरून मतदान केलं त्या कोणवासीयांसाठी त्यांनी पंचवीस वर्षात काही केले नाही. आजही कोकणातील तरुण उद्योगधंद्यासाठी मुंबईत जातो. येथे कुठल्याही रोजगाराची संधी नाही. याठिकाणी शेतकरी देखील एकच पीक काढतो. शेतकऱ्यांच्या मालाला, हाताला, आंब्याला, काजूला कोणताही हमीभाव नाही. आज आमचा कोकणी शेतकरी बांधव अडचणीत आहे. या ठिकाणी वादळ झालं. यापूर्वी  वादळ झाले असताना पश्चिम महाराष्ट्राला हजारो कोटीचे पॅकेज दिलं. मात्र, कोकणासाठी केवळ शंभर कोटीचा पॅकेज दिलं. ही मदत आजही येथील नागरिकांपर्यंत पोहोचले नाही. आजही शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी ते आले नाहीत. अशा प्रकारची अवस्था याठिकाणी शिवसेनेने करून ठेवली आहे. यासंदर्भात आम्ही नवनिर्माण सेना आवाज उठवणार आहोत आणि त्यांना याबाबत जाब विचारणार आहोत. मात्र, एवढे नक्की हा दौरा कोणताही शासकीय दौरा नव्हता तर त्यांचा खासगी दौरा होता. त्यामुळे कोकणातील जनतेने आता विचार करण्याची वेळ आली आहे की, ज्या शिवसेनेला आपण मतदान करत होतो. त्या शिवसेनेपासून आता विचार करून बाजूला व्हावे आणि नव्या दमाच्या खंद्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभे राहावे.

*_🧰💡आयटीआय मध्ये प्रवेश मिळाला नाही कशाला निराश होताय???…निश्चिंत रहा..मुक्त विद्यापीठ आपणास तंत्र शिक्षणाची सुवर्णसंधी उपलब्ध करून देत आहे🤩😍_*

   *🧰डिप्लोमा इन इलेक्ट्रिशियन🧰*
_तंत्रशिक्षण क्षेत्रात करिअर करण्याची सुवर्णसंधी_

💫आजच भेट द्या आणि आपला प्रवेश निश्चित करा!

*🏃🏻‍♂️प्रवेश सुरु*
*सावंतवाडी अभ्यास केंद्र संपर्क*
*_📱9422896699_*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!