🟥 दवाखान्यातून डिचार्ज घेऊन घरी परतत असणाऱ्या युवकाचा अपघातात जागीच मृत्यू..
🟥 बारामती येथील घटना..
🎥 Kokan Live Breaking News
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴बारामती, दि-०८:- मृत्यू हा अटळ आहे. तो कधी, कोठे आणि केव्हा येईल हे सांगता येत नाही. दवाखान्यातून डिचार्ज घेऊन घरी परतत असणाऱ्या युवकाचा अपघातात जागीच मृत्यू झाल्याने याची प्रचिती आल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे.
बारामती शहरातील एका खाजगी दवाखान्यातून डिस्चार्ज घेऊन घरी परतत असताना अपघात झाल्याने एका युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. काल सांयकाळच्या सुमारास येथील प्रशासकीय भवना समोरून जाणाऱ्या रिंगरोड वरती भरधाव वेगाने धावणाऱ्या हायवा वाहनाने दुचाकीवरून जाणाऱ्या माय-लेकाला जोरदार धडक दिली. या धडकेत २१ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तेजस विजय कासवे (वय २१ वर्ष) असं अपघातात दुर्दैवी मृत्यू झालेल्या युवकाचं नाव असून आई राधिका कासवे या गंभीर जखमी झाल्याचे कळत आहे.
मिळालेली अधिक माहिती अशी की, तेजस कासवे दोन दिवसांपूर्वीच आपल्या नाकाच्या शस्त्रक्रियेसाठी शहरातील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये भरती झाला होता. डॉक्टरांनी काल त्याच्या नाकावर यशस्वी शत्रक्रिया केली होती. त्यानंतर डॉक्टरांनी त्याच्यावर आवश्यक ते उपचार करून आज रुग्णालयातून घरी जाण्यास परवानगी दिली होती. त्यानंतर तेजस आणि त्याची आई हे आपल्या दुचाकीवरून घरी जाण्यासाठी निघाले असता भरधाव वेगात आलेल्या हायवाने त्यांच्या दुचाकीला धडक दिल्याने तेजसचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शीनी दिली.
दरम्यान, अवजड वाहनांच्या अपघातांचे प्रमाण वाढले असून यामध्ये अनेक निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. प्रशासनाने अशा अवजड आणि भरधाव वेगाने धावणाऱ्या वाहनांवर अंकुश ठेवून कडक कारवाई करण्याची आवश्यकता असल्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे.
*……………सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…👇👇*
🥳💥🎉🎊🎉💥🥳
*ब्रँडेड कंपनीचा टीव्ही घ्यायचा विचार करताय तर मग तुमच्यासाठी घेऊन येत आहोत भन्नाट ऑफर..*
*👉BPL चा 32 इंच SMART TV आता फक्त ₹10500/- मध्ये सोबत 3 वर्षाची वॉरंटी सह*
*📍ठिकाण-* *श्री विद्या इलेक्ट्रॉनिक्स कसाल , कॅनरा बँक जवळ*
*📍स्टोअर लोकेशन -* https://maps.app.goo.gl/S52sh7bCPTLiuAQX7
*📞संपर्क* – 9860055359
9422435891
9175242886
*👇व्हाट्सअप ग्रुपला जॉईन👇*
https://chat.whatsapp.com/L98lsluvDtcILuqChjnJaP
*🎤त्वरा करा, बुकिंग सुरू 🎤*

