कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 बांदा – दाणोली मार्गावर वाफोली व विलवडे येथील रस्त्याची अक्षरशः दुरवस्था..

🟥 संबंधित विभागाने तात्काळ रस्ता डागडुजी करून प्रवाशांसाठी सुरळीत करावा ; अल्पसंख्यांक सेल सिंधुदुर्ग उप जिल्हा प्रमुख रियाझ खान

🎥 Kokan Live Breaking News

✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस

🎴बांदा, दि-०६:- बांदा-दाणोली मार्गावर वाफोली व विलवडे येथील रस्त्याची अति पाऊसामुळे रस्ता पूर्णतः खड्डेमय बनला आहे.रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता हेच मुळात कळत नाही.गणपतीपूर्वी सदर रस्त्याची सार्वजनिक बांधकाम खात्याकडून तात्पुर्ती डागडुजी करण्यात आली होती.त्यानंतर रस्ता वाहतुकिस सुरळित करण्यासाठी संबधित विभागाची कोणतीही हालचाल दिसुन आली नाही. उलट रस्‍त्याची समस्या खुपच बिकट बनली आहे.विलवडे येथील टेंबवाडी, सावंतवाडा येथे उतारावर दोन ठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत.काही महिन्यापुर्वी वाफोली धरणा नजीक डांबरीकरण केलेल्या पुलावर भलेमोठे खड्डे पडले,तर बांदा ते वाफोली रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे.डोंगरीकर हाँटेल समोर जीवघेणे खड्ड्यामुळे रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. गोव्यात जाण्या येण्यासाठी पर्यटक याच मार्गाचा अवलंब करत असतात.खड्यांमुळे हा मार्ग प्रवाशांसाठी धोकादायक ठरत आहेत.या खड्ड्यांमुळे हा वाहनांसाठी मार्ग आहे की नाही हेच कळत नाही आहे.या मार्गावरून प्रवास करत असताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. खड्डे बुजविण्यासाठी संबंधित विभागाला बळी गेल्यावर जाग येणार का? यापुढे या मार्गावर खड्ड्यामुळे अपघातात दुर्घटना घडल्यास संबंधित विभाग जबाबदारी घेणार का? असा संतप्त सवाल स्थानिकांतून व्यक्त होत आहे.

शाळेतील विद्यार्थाना प्रवास करणे धोक्याचे बनले आहे.विलवडे व वाफोली पूर्ण रस्त्याची चाळण झाली असून ठिकठिकाणी महाकाय खड्डे अपघाताला निमंत्रण देत आहेत. सद्यस्थितीत रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून अपघाताची दाट शक्यता नाकारता येत नाही.त्यामुळे भविष्यात होणारे संभाव्य अपघात टाळण्यासाठी संबंधित विभागाने तातडीने योग्य ते पाऊल उचलावे अशी मागणी रियाझ खान यांनी केली आहे.

 

 

*……………सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…👇👇*

 

 

🥳💥🎉🎊🎉💥🥳

*ब्रँडेड कंपनीचा टीव्ही घ्यायचा विचार करताय तर मग तुमच्यासाठी घेऊन येत आहोत भन्नाट ऑफर..*

 

*👉BPL चा 32 इंच SMART TV आता फक्त ₹10500/- मध्ये सोबत 3 वर्षाची वॉरंटी सह*

 

*📍ठिकाण-* *श्री विद्या इलेक्ट्रॉनिक्स कसाल , कॅनरा बँक जवळ*

 

*📍स्टोअर लोकेशन -* https://maps.app.goo.gl/S52sh7bCPTLiuAQX7

 

*📞संपर्क* – 9860055359

9422435891

9175242886

 

*👇व्हाट्सअप ग्रुपला जॉईन👇*

https://chat.whatsapp.com/L98lsluvDtcILuqChjnJaP

 

*🎤त्वरा करा, बुकिंग सुरू 🎤*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!