कोकणदोडामार्गमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

🟥 तालुक्यातील नवरात्रोत्सव मंडळांनी धार्मिक कार्यक्रमांसोबत सामाजिक उपक्रम राबविण्यावर भर द्यावा ; पोलीस निरीक्षक अरुण पवार

🟥 तालुक्यातील नवरात्रोत्सव मंडळांची दोडामार्ग पोलीस ठाण्यात बैठक संपन्न..

🎥 Kokan Live Breaking News

✍️ प्रतिनिधी : प्रतिक राणे

🎴दोडामार्ग, दि-०५:– दोडामार्ग तालुक्यातील नवरात्रोत्सव मंडळांनी धार्मिक कार्यक्रमांसोबत सामाजिक उपक्रम राबविण्यावर देखील तेवढाच भर द्यावा. नवरात्रोत्सव शांततेत व सलोख्यात पार पाडण्यासाठी मंडळांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी असे आवाहन पोलीस निरीक्षक अरुण पवार यांनी बोलताना केले. नवरात्रोत्सव मंडळांसाठी आयोजित केलेल्या बैठकीत श्री. पवार बोलत होते.

येथील पोलिस ठाण्यात श्री. पवार यांनी दोडामार्ग शहरातील तसेच तालुक्यातील अन्य गावांमधील सार्वजनिक नवरात्रोत्सव उत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची विशेष बैठक आयोजित केली होती. यंदाच्या गणेशत्सवात बाजारपेठेसोबत संपूर्ण शहर परिसरात वाहतुकीचे चोख नियोजन केल्याबद्दल श्री. पवार यांचे बैठकीच्या सुरुवातीला दोडामार्ग शहरातील गणेशोत्सव मंडळातर्फे अध्यक्ष अजित चांदेलकर, सचिव नितीन मणेरीकर, आनंद कामत यांच्याकडून विशेष अभिनंदन करण्यात आले. त्यानंतर बोलताना श्री. पवार म्हणाले की, नवरात्रोत्सव मंडळांनी नवरात्रोत्सव साजरा करताना अनेक खबरदारी घेणे आवश्यक आहे. लाऊडस्पिकरच्या व अन्य सर्व परवानग्या पोलीस प्रशासनाकडून घ्याव्यात शिवाय पोलीस ठाण्यात ऑनलाईन प्रक्रियेद्वारे आवश्यक असलेली सर्व कार्यवाही पूर्ण करून पोलीस तसेच अन्य प्रशासनाला सहकार्य करावे. नवरात्रोत्सव शांततेत व सालोख्यात साजरा करण्याबाबत धार्मिक व सामाजिक कार्यक्रम उपक्रम राबवून एक वेगळा आदर्श आपल्या मंडळांचा निर्माण करावा. दुर्गा मातेच्या ठिकाणी स्वच्छ्ता तसेच स्वयंसेवक नेमणे, महाप्रसादावेळी योग्य ती काळजी घेणे आदींकडे श्री. पवार यांनी लक्ष वेधले.

 

ही मंडळे साजरी करणार नवरात्रोत्सव

 

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ दोडामार्ग, सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ साटेली वरचा बाजार, श्री गणराज आदर्श सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ साटेली गावठणवाडी- सुतारवाडी, नवरात्रोत्सव मंडळ साटेली भेडशी हरिजन वाडी, सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ भेडशी, नवदुर्गा उत्सव मंडळ पिकुळे लाडाचे टेंब, सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ मांगेली तळेवाडी, शारदा युवक मंडळ कुडासे वानोशी, श्री प्रदीप सिताराम नाईक मित्र मंडळ पाळये, सातेरी नवरात्र उत्सव मंडळ सासोली, सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ आडाळी ही मंडळे यंदाचा नवरात्रोत्सव साजरा करणार आहेत या सर्व मंडळांचे पदाधिकारी सदर बैठकीला उपस्थित होते.

 

 

*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

 

_________________________

आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

 

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*

*🌳सावंतवाडी🌴*

 

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

 

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

 

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

 

*🛑आमची वैशिष्टे:-*

🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…

🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…

🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…

🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…

🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…

🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…

🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

 

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

 

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

 

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

 

☎️ *संपर्क:-*

*📲श्री.अतूल नाखरे:-*

*9420204505*

*7820800938*

*9404740679*

*7276182104*

 

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_

*अँड.एम.एस.भांगले*

*9422374276*

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!