कणकवलीकोकणमहाराष्ट्र

राजधानी एक्सप्रेसच्या धडकेत तीन म्हशी मृत्युमुखी

*🟥राजधानी एक्सप्रेसच्या धडकेत तीन म्हशी मृत्युमुखी*

*🟥हळवल फाट्यानजीक रेल्वे ट्रॅकवरील घटना*

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 कणकवली, दि.०३:* मुंबईहून मडगावच्या दिशेने जाणाऱ्या राजधानी एक्सप्रेसची धडक बसल्याने तीन म्हशी जागीच मृत्युमुखी पडल्या. ही घटना सोमवारी सकाळी ९.४५ वाजण्याच्या सुमारास कोकण रेल्वे मार्गावरील हळवल फाट्यानजीक ट्रॅकवर घडली. या अपघातामुळे राजधानी एक्सप्रेसच्या इंजिनात बिघाड झाल्यामुळे फाटकापासून काही अंतरावर १ तास थांबविण्यात आली. त्यानंतर रेल्वे कर्मचाऱ्यांनी इंजिनाची दुरुस्ती करत ट्रॅकही निर्धोक केल्यानंतर सदर गाडी मडगावच्या दिशेने रवाना झाल्या. मात्र, या घटनेमुळे गाडी प्रवाशांचे हाल झाले. हळवल फाटकानजीक असलेल्या रेल्वेच्या ट्रॅकवरून कणकवली रेल्वे स्थानकाच्या दिशेने तीन म्हैशी जात होत्या. त्याचवेळी मुंबईहून मडगावच्या दिशेने जाणाऱ्या राजधानी एक्स्प्रेसची (१२४३२) म्हशींना जोरदार धडक बसली. यापैकी एक म्हैस इंजिनमध्ये अडकली, दुसरी म्हैस ५०० ते ७०० मीटर ट्रॅकवरून फरफटत गेली. तर तिसरी म्हैस रेल्वे ट्रॅकबाहेर फेकली गेल्याने त्या म्हशींचा मृत्यू झाला .

अपघातानंतर राजधानी एक्सप्रेसच्या इंजिनात बिघाड झाल्याने गाडी फाटकापासून काही अंतरावर थांबविण्यात आली. याशिवाय ट्रॅकवरील रुळाचे हूकही निखळले होते. घटनास्थळी रेल्वे कर्मचारी संदेश जाधव, भाई परब, संदीप जाधव, अंगुली तांबे, रितेश कांबळे, गौरेश कदम, विकास कासले यांनी धाव घेत इंजिनामध्ये अडकलेली व रेल्वे ट्रॅकवर पडलेल्या दोन म्हशी बाजूला केल्या. त्यानंतर अपघातामुळे राजधानी एक्सप्रेस इंजिनात झालेल्या बिघाडाची दुरुस्ती केली. तसेच निखळलेले हूक कर्मचाऱ्यांनी बसविले.

टॅक निर्धोक झाल्यानंतर १ तासानंतर सदर गाडी मडगावच्या दिशेने रवाना झाली. दरम्यान, पनवेल रेल्वे स्थानकापासून काही अंतरावरील रेल्वे ट्रॅकवरून शनिवारी रात्री मालगाडी घसल्याने कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. परिणामी, रेल्वे गाड्यांचे शेड्यूलही बिघडले आहे. त्यामुळे या मार्गावरून ये-जा करणाऱ्या गाड्या उशिराने धावत असून प्रवाशांचे हाल झाले आहेत. त्यातच ही घटना घडल्याने राजधानी एक्सप्रेसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या हालांमध्ये भर पडली.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

____________________________

 

*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*

*🥳स्वप्नातलं घर ….आवाक्यातला घर🏬 ….एकच नक्षत्र रेसिडेन्सी🥳*

*🎦Kokan Live Breaking||Advertise*

_✨🏃🏼‍♂️🏃🏼‍♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_

*🏬नक्षत्र रेसिडेन्सी🏬*
_सावंतवाडी_

*🏬Ready Possession Flat’s Available*

*🏃🏼‍♂️वेळ दवडू नका आजच आपले हक्काचे घर बुक करा*

*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9422054540
9422075777

*🏫पत्ता :-*
*Nakshtra Residency*
भटवाडी रोड, लक्ष्‍मीनारायण मंदिर,
रॉयल गार्डन शेजारी,सावंतवाडी ४१६५१०

*▪️ऑफिस पत्ता:-*
UG/35,Laxminakshtra Tower
Kudal, Dist. Sindhudurg

———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!