आपत्कालीनकुडाळकोकणमहाराष्ट्र

दुचाकीच्या धडकेत शाळकरी मुलगा गंभीर जखमी

दुचाकीच्या धडकेत शाळकरी मुलगा गंभीर जखमी

कुडाळ येथील घटना : अनोळखी दुचाकीस्वार पसार

कुडाळ

येथील नगरपंचायत बालोद्याना समोरील मुख्य मार्गावर हॉटेल चिंतामणीनजीक रस्ता ओलांडत असताना रुद्र संतोष चव्हाण (१०, रा. कुडाळ विठ्ठलवाडी) या शाळकरी विद्यार्थ्याला मोटारसायकलची जोरात धडक बसली. यात त्याला गंभीर दुखापत झाली. मात्र, धडकेनंतर तो अनोळखी दुचाकीस्वार दुचाकीसह पळून गेला. ही घटना रविवारी दुपारी १२.३० च्या सुमारास घडली. याबाबत फिर्याद रुद्रचे वडील संतोष नाथा चव्हाण यांनी कुडाळ पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार अनोळखी दुचाकीस्वाराविरुद्ध सोमवारी दुपारी गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, रुद्रवर येथील महिला बाल रुग्णालयात उपचार सुरू आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!