कुडाळात जंगलमय भागात सापडली मानवी कवटी, हाडे
*🟥कुडाळात जंगलमय भागात सापडली मानवी कवटी, हाडे*
*🟥शहरात खळबळ :पोलिसांची घटनास्थळी धाव*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻 ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 कुडाळ, दि.०२:* कुडाळ शहरातील केळबाईवाडी येथील एका जंगलमय भागात ओहोळानजीक रविवारी एक मानवी कवटी व तीन-चार हाडे आढळली आहेत. या घटनेने शहरात खळबळ आहेत. उडाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव दुकानदाराने वेधले लक्ष घेत पंचनामा करून ती कवटी व हाडे ताब्यात घेतली.
दरम्यान, दोन महिन्यांपूर्वी कुडाळ-तुपटवाडी झोपडपट्टीमधील कातकरी समाजातील एक व्यक्ती बेपत्ता झाल्याची तक्रार कुडाळ पोलीस ठाण्यात दाखल असून त्या अनुषंगाने पोलीस तपास करीत आहेत. फॉरेन्सिक टीमने घटनास्थळी येऊन पाहणी केली. बेपत्ता व्यक्ती व त्याच्या बहिणीच्या डीएनए चाचणीअंती ती कवटी व हाडे त्या बेपत्ता व्यक्तीची आहेत की नाही हे स्पष्ट होणार आहे. या घटनेची माहिती बेपत्ता व्यक्ती रामा सावळा पवार (४८) यांची बहीण सुरेखा रामजी पवार यांनी कुडाळ पोलिसांना रविवारी दुपारी एक वाजण्याच्या दूरध्वनीवरून दिली. कुडाळ केळबाईवाडी येथील एका जंगलमय भागात ओहोळानजीक एक मानवी कवटी व हाडे सापडली आहेत, असे तिने सांगितले. त्यानुसार कुडाळ पोलीस ठाण्याच्या निरीक्षक सगाल मुल्ला, सहाय्यक पोलीस निरीक्षक व्ही. बी. सूर्यवंशी, उपनिरीक्षक कऱ्हाडकर, सहाय्यक उपनिरीक्षक देवानंद माने तात्काळ घटनास्थळी दाखल झाले, त्यानंतर ती कवटी व हाडांचा पंचनामा करून ते ताब्यात घेतले .
*बेपत्ता झाल्याची तक्रार*
दरम्यान 27 जुलै 2023 पासून रामा सावळा पवार आपल्या घरातून बेपत्ता झाल्याची तक्रार सुरेखा पवार यांनी २८ जुलै रोजी कुडाळ पोलीस ठाण्यात दिली होती. सुरेखा यांच्या बाजूलाच त्यांचा भाऊ रामा पवार हा वेगळी झोपडी बांधून राहत होता. याठिकाणी ते गेली ३५ वर्षे राहत आहेत.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
__________________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards
▫️1BHK -14.38 Lac Onwards
▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards
▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards
🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻♂️*
*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9773815402
9773207862
9561253129
8652678734
*🏫पत्ता :-*
CREADAI SAWANTWADI
टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

