आणखीकरियरकोकणरत्नागिरीशासकीय

उप पोलीस अधीक्षक सूरज गुरव यांना भारत सरकारचा बेस्ट डिटेक्शन पुरस्कार..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : संतोष पिलके

🎴चिपळूण,दि.१०: पोलीस स्थानकात डिवायएसपी म्हणून कामकाज केलेले सूरज गुरव यांना आज भारत सरकारचा बेस्ट डिटेक्शन पुरस्कार मिळाला. पोलीस खात्यात त्यांना सात वर्षे पूर्ण झाली आहेत. या काळात अनेक गुंतागुंतीच्या गुन्हयाची उकल त्यांनी स्वतः केली आहे. त्यापैकी महत्त्वाचे आव्हानात्मक असे अनेक खुनांच्या घटनांचा तपास गुरव यांनी स्वतः जीव लावून शोधून काढून आरोपीच्या मुसक्या आवळून जेल मध्ये टाकले होते. त्यापैकी कोल्हापूर  शाहूवाडी येथे  डिवायएसपी म्हणून कार्य करताना शित्तूर वारूळ मर्डर केस त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची होती. कारण आरोपीने डोके लावून केलेला मर्डर शोधताना खरोखरच पोलीसी कसब पणाला लावून त्यांनी हा मर्डर उघडकीस आणला होता.

याबाबत या पुर्वीच पोलीस महासंचालक यांचे २०१७ चे बेस्ट डिटेक्शन रिवार्ड प्राप्त झाले होते. आज याच गुन्हयांच्या कामगिरीसाठी गृहमंत्री भारत सरकार यांचे बेस्ट डिटेक्शन पदक प्राप्त झाले होते. हे पदक त्यांना आज गुरुवार दिनांक १० डिसेंबर रोजी प्राप्त झाले .

यापूर्वी २०१८ साली डिवायएसपी असताना तामगाव मोरवाडी दुहेरी खून प्रकरण या आव्हानात्मक गुन्हयासाठी पोलीस महासंचालक यांचे बेस्ट डिटेक्शन रिवार्ड आणि २०१९ ला चिपळूण येथील बहुचर्चित रामदास सांवत मर्डर केससाठी पोलीस महासंचालक यांचे बेस्ट डिटेक्शन रिवार्ड प्राप्त झाले आहे.

पुरस्कार मिळाल्याबद्दल सूरज गुरव यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

*_💥आरोंदा पंचक्रोशीतील लोकांसाठी सुविधा..💥_*

*🔥 श्री दत्त क्लिनिकल लॅबोरेटर 🔥*

*_🔬सर्व प्रकारच्या खात्रीशीर टेस्ट मिळण्याचे एकमेव ठिकाण.._*
💫सन 1994 पासूनची विश्वसनीय परंपरा..
💫शिरोडानंतर आरोंदा येथे दुसरी शाखा..
💫आरोंदा, गुळदुवे, नाणोस, तळवणे, भटपावणी, मळेवाड, केरी व पालये सह लगतच्या गावांतील नागरीकांची उत्तम सोय..
💫पूर्णपणे कम्प्युटराईज लॅबोरेटरी..
💫कोणत्याही आजारावर खात्रीशीर टेस्टिंग रिपोर्ट मिळण्याचा पर्याय उपलब्ध..

*_🙋🏼‍♂️आमचा पत्ता ⬇️_*
*🏬श्री दत्त क्लिनिकल लॅबोरेटरी*
वक्रतुंड ट्रेडर्स, अपना बाजार व मुकुंद बाजार च्या समोर, आरोंदा, ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
*📱9422058778*
*📱7066290913*
*📱9420647895*

*_🚫टीप : लॅब दर सोमवारी बंद राहील.._*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!