🟥 जिल्हा काँग्रेसचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष समिर वंजारी यांची नियुक्ती वादाच्या भोवऱ्यात..
🎥 Kokan Live Breaking News
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴सावंतवाडी, दि-२८:- जिल्हा काँग्रेसचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष समिर वंजारी यांची नियुक्ती वादात सापडली आहे. वंजारी यांची झालेली नियुक्ती हा जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचा अपमान आहे. पक्षा प्रामाणिक कार्यकर्त्याला किंमत नाही, असा आरोप करीत जेष्ठ नेते विकास सावंत यांच्यासह तालुकाध्यक्षांसह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपल्या पदाचा सामुदायिक राजीनामा प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे दिला आहे. दरम्यान वंजारी यांची झालेली नियुक्ती आपल्याला मान्य नाही, असे सांगून चंद्रपूर जिल्हाध्यक्षपदाच्या बाबत जो निर्णय घेण्यात आला, तसा निर्णय या ठिकाणी घ्यावा आणि त्यांच्या निवडीला स्थगिती देण्यात यावी, अशी मागणी कार्यकर्त्यांच्या बैठकीत करण्यात आली आहे, तसे पत्र तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांनी दिले आहे.
काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी असलेल्या शेख यांना तडकाफडकी हटवून त्या ठिकाणी वंजारी यांची नियुक्ती करण्यात आली. परंतू ही नियुक्ती करताना कोणत्याही जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना विश्वासात घेतले नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. तर दुसरीकडे शेख यांना आगामी काळात होणाऱ्या निवडणूका पर्यंत मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रभारी शंशाक बावचकर यांच्या उपस्थित झालेल्या जिल्हा काँग्रेसच्या बैठकीत करण्यात आली होती. मात्र या ठरावाला केराची टोपली दाखविल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच कार्यकर्त्यांच्या भावनांना किंमत दिली जात नसेल तर आम्ही सामुहिक राजीनामे देत आहोत, अशी पदाधिकाऱ्यांनी मांडली आहे.
या राजीनामा पत्रावर माजी जिल्हाध्यक्ष प्रदेश प्रतिनिधी विकास सावंत, हीरोजी परब, तालुकाध्यक्ष अभय शिरसाट, मेघनाद धुरी, महेंद्र सांगेलकर, प्रदिप मांजरेकर, वासुदेव नाईक, दालमिया पाटणकर, विजय प्रभू, किरण टेंबूलकर, नागेश मोर्ये, उत्तम चव्हाण, प्रविण वसनकर, उमेश कुलकर्णी, सिध्देश परब, कृष्णा धाऊसकर, सुभाष दळवी, केतन गावडे, आनंद परुळेकर, जगन्नाथ बोंद्रे, राघवेंद्र नार्वेकर, अफरीन करोल आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत.
*……….. सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2
————————————-
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

