कसाल-तेलीवाडी येथे लाखाची गोवा दारू जप्त
*🟥कसाल-तेलीवाडी येथे लाखाची गोवा दारू जप्त*
*🟥सिंधुदुर्गनगरी पोलिसांची कारवाई*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 ओरोस, दि.२८:* विक्रीच्या हेतूने गोवा बनावटीच्या दारुचा अवैध साठा केल्याप्रकरणी ज्ञानेश्वर सहदेव कमतेकर (रा. कसाल-तेलीवाडी) याच्यावर सिंधुदुर्गनगरी पोलिसांनी कारवाई केली आहे. छाप्यात आढळून आलेला एक लाख किमतीचा गोवा बनावटीचा दारुसाठा जप्त केला आहे. जिल्ह्यातील अवैद्य दारुविक्री, वाहतूक व ताबा, शस्त्रे, अंमली पदार्थ विक्री वाहतूक, ताबा व इतर सर्व प्रकारचे अवैध धंदे यावर कारवाईसाठी संपूर्ण जिल्ह्यात ऑलआउट ऑपरेशन राबविण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिले होते. त्यानुसार सिंधुदुर्गनगरी पोलीस स्थानक हद्दीत कसाल-तेलीवाडी येथे अवैध दारू विक्री होत असल्याची माहिती सिंधुदुर्गनगरी पोलिसांना मिळाली होती. सहाय्यक पोलीस निरीक्षक मनिष कोल्हटकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक नितीन कदम, पोलीस नाईक
स्नेहल राणे, हुमर्मालेकर यांनी मारुती हिंदळेकर आणि संदेश पाडगावकर या दोन पंचासह छापा टाकला होता. या छाप्यात ज्ञानेश्वर कामतेकर आपल्या घराच्या मागील पडवीत गोवा बनावटीचे दारूने भरलेले बॉक्स घेऊन बसलेला आढळून आला, चौकशी दरम्यान हा माल आपण विक्री करण्यासाठी आणून ठेवलेला आहे, असे त्याने सांगितले असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. त्यामुळे मुद्देमालासह त्याला ताब्यात घेण्यात आले. यामध्ये डॉक्टर ब्रँडी, रम, व्हिस्की, रॉयल चॅलेंज्स, रॉयल स्टेग इत्यादी प्रकारच्या एकूण ९९ हजार ६४८ रुपयांची दारू मिळून आली. २६ रोजी रात्री कसाल-तेलीवाडी येथे ही कारवाई करण्यात आली असून संशयित आरोपी विरोध महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम कलम ६५ (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक नितीन कदम व कॉन्स्टेबल श्रीमती नगर्गोजे करीत आहेत.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
————————————
*🤗मुतखडा 💯% विरघळतो*
*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*
*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*
📍 *वैशिष्ठे* 📍
*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*
*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*
*🔸शरीरातील उष्णता कमी करते*
*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*
🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*
*👍एक वेळ अवश्य वापरा*
*💯% फरक नाहीतर पैसे परत*
📞 *अधिक माहिती संपर्क करा*
9145449999
📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*
https://bit.ly/3sh8qr2
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

