राहुल-समीरच्या अपघाती मृत्यूने माणगाव खोरे हळहळले
*🟥राहुल-समीरच्या अपघाती मृत्यूने माणगाव खोरे हळहळले*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻 ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 दुकानवाड, दि.२८:* आंजिवडे-गवळीवाडी – येथील राहुल प्रकाश पंदारे (२४) व संभाजी उर्फ समीर दत्ताराम पंदारे (२१) या दोन युवकांच्या सावंतवाडी येथे झालेल्या अपघाती मृत्यूने माणगाव खोऱ्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. दोघेही गरीब कुटुंबातील होते. रात्री उशिरा आंजिवडे येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. राहुल व समीर हे दोघे मंगळवारी सकाळी घरातून बाहेर पडले. सावंतवाडी येथे असणारे त्यांचे चुलतभाऊ. कृष्णा पंदारे यांच्या घरी दुपारचे जेवण उरकून गोठण-सावंतवाडी येथे गौरव शिर्के यांच्या घरी ते भजनासाठी गेले. भजन संपल्यानंतर दोघेही पुन्हा कृष्णा पंदारे यांच्याकडे येण्यासाठी मोटारसायकलने निघाले असताना वाटेत भेडला माड त्यांच्यावर कोसळला. यात राहुलच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली, तर समीर वाच्या छातीला मार लागल्याने दोघांचाही जागीच मृत्यू झाला. समीर विजेच्या तारांमध्ये अडकल्याने
विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याचा संशय आहे. राहुल हा गरीब कुटुंबातील होता. तो अतिशय प्रेमळ होता. त्याला भजनाची आवड होती. तो स्वतः उत्कृष्ट गायक होता. गोव्यात एका कंपनीत तो कामाला होता. त्याचे आई-वडील मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करतात. पश्चात आई- वडील, एक मोठा भाऊ व विवाहित बहीण असा परिवार आहे. तर समीर हा आईसोबत सावंतवाडी येथे राहत होता. त्याचे कुटुंबही गरीब आहे. आई मोलमजुरी करून उदरनिर्वाह करते. समीर हा सावंतवाडी येथे किरकोळ कामे करायचा. त्याच्या पश्चात आई-वडील, एक भाऊ, दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे. शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी मृतांच्या वारसांना प्रत्येकी एक लाख रु. ची मदत जाहीर केली. तसेच गोपीनाथ मुंडे अपघात योजनेतून व मुख्यमंत्री सहाय्यक निधीतून मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले, तर आमदार वैभव नाईक यांनी आपण दोन्ही कुटुंबांना आर्थिक मदत देण्याचे आश्वासन दिले.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
__________________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards
▫️1BHK -14.38 Lac Onwards
▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards
▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards
🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻♂️*
*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9773815402
9773207862
9561253129
8652678734
*🏫पत्ता :-*
CREADAI SAWANTWADI
टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

