कणकवलीकोकणक्राइममहाराष्ट्र

मारामारी करणाऱ्या दोन मद्यपींना पोलिसांचा प्रसाद

मारामारी करणाऱ्या दोन मद्यपींना पोलिसांचा प्रसाद

कणकवली

येथील आप्पासाहेब पटवर्धन चौक येथे दारुच्या नशेत धांगडधिंगाणा घालणाऱ्या, मारामारी करणाऱ्या दोन युवकांना कणकवली पोलिसांनी चांगलाच प्रसाद दिला. केला. ही घटना सोमवारी सायंकाळी ६.३० वा. च्या सुमारास घडली.

गणेशोत्सव सुरू असल्याने कणकवली शहरात, बाजारपेठेमध्ये नागरिकांची खरेदीसाठी मोठी गर्दी असते. सोमवारी सायंकाळीही आप्पासाहेब पटवर्धन चौकात मोठी
गर्दी होती. याचवेळी दोन मद्यपी युवक एकमेकांसोबत मारामारी करू लागले. तेथे उपस्थित पोलिसांनाही ते ऐकेनात. अखेर तेथे पोलीस अधिकाऱ्यांसह दाखल पोलिसांनी दोघांनाही पोलीस व्हॅनमध्ये घालण्याचा प्रयत्न केला .

मात्र, तेथेही दोघांचा अरेरावीपणा सुरुच असल्याने एका पोलीस अधिकाऱ्याने दोघांनाही चांगलाच प्रसाद दिला. पुढे दोघांना पोलीस ठाण्यात नेल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सायंकाळी उशिरा सुरू होती .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!