भगवंतगड माळरानावर बिबट्याचा मुक्त संचार
भगवंतगड माळरानावर बिबट्याचा मुक्त संचार
आचरा
चिंदर लब्देवाडी भगवंतगड माळरानावर बिबट्याच्या मुक्तसंचाराने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. बिबट्याकडून पाळीव जनावरांवर हल्ले करण्याचे प्रकारही वाढले आहेत. दिवसाढवळ्या बिबट्या दर्शन देत असल्याने वन विभागाने तात्काळ बंदोबस्त
करण्याची मागणी ग्रामस्थांमधून होत आहे. पाच दिवसांपूर्वी लब्देवाडी येथील समीर लब्दे यांच्या बकऱ्यांवर माळरानावर बिबट्याने हल्ला केला होता. तेरई येथील ग्रामस्थांच्या बकऱ्यांवरही त्याने हल्ला केला आहे. ग्रामस्थ भयभीत असून वनविभागाने पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

