कणकवलीकोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

असलदे गावातील पाच दिवसांच्या गौरी – गणपतीचे थाटात विसर्जन

असलदे गावातील पाच दिवसांच्या गौरी – गणपतीचे थाटात विसर्जन

गणपती बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकर …गणेश भक्तांचा जयघोष…!

कणकवली (प्रथमेश जाधव)
गणपती बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकर या…,गणपती गेले गावाला चैन पडेना आम्हाला..असा जयघोष करीत असलदे गावातील पाच दिवसांच्या गणेश मूर्तींचे शनिवारी सायंकाळी थाटात विसर्जन केले . यावेळी गणेश भक्तांनी गणपती विसर्जन काढत गणपती बाप्पाचा जयघोष केला.

मंगळवार १९ सप्टेंबरला घरोघरी गणेश चतुर्थी निमित्त गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. त्यामुळे सर्वत्र आरत्या, भजनांचा नाद एकायला मिळत होता. गुरुवारी घरोघरी गौराईचे आगमन झाले होते. शुक्रवारी गौराईचे सुवासिनींनी विधीवत पूजन केले. त्यानंतर दुपारी नैवेद्य अर्पण करून आरती, भजन आणि फुगड्यांनी मातेचा जागर झाला. शनिवार २३ सप्टेंबरला गौरी-गणपतींना भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला.

असलदे गावातील गणेश मूर्ती विसर्जन स्थळांवर भाविकांची गर्दी होती. असलदे उगवतीवाडी येथील गणेश कोंड विसर्जन येथे ब्राम्हणदेव सेवा मंडळाच्यावतीने पाच दिवसांच्या गणपतींचे थाटात विसर्जन करण्यात आले.यावेळी जोरदार बाप्पाचा जयघोष करण्यात आला. एकाच वेळी सर्व गणपतींची एकत्रित महाआरती करत सर्वांनी दर्शन घेतले.लहान मुलं,महिला,युवक, अबाल वृद्धांनी हा विसर्जन सोहळा पाण्यासाठी मोठी गर्दी केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!