Uncategorized

२५,२६ व २७ सप्टेंबर ला पाट हायस्कूल येथे शालेय विभागीय व्हॉलीबॉल स्पर्धेचा थरार..

२५,२६ व २७ सप्टेंबर ला पाट हायस्कूल येथे शालेय विभागीय व्हॉलीबॉल स्पर्धेचा थरार..

पाट हायस्कूलचे तीन संघ करणार जिल्ह्याचे प्रतीनिधित्व..

समीर चव्हाण
वेंगुर्ला म्हापण

दिनांक २५, २६ व २७ सप्टेंबर २०२३ कालावधीत पाट हायस्कूल येथे शालेय विभागीय व्हॉलिबॉल स्पर्धेचा थरार रंगणार आहे. या स्पर्धेमध्ये कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील प्रथम क्रमांक प्राप्त संघ सहभागी होणार आहेत. या स्पर्धेच्या निमित्ताने क्रीडा रसिकांना राष्ट्रीय व राज्यस्तरीय खेळाडूंचा खेळ पाहण्याची संधी मिळणार आहे.
विशेष म्हणजे विविध वयोगटातील प्रथम क्रमांक प्राप्त ६ संघापैकी ३ संघ हे पाट हायस्कूलचे आहेत. पाट हायस्कूलचा व्हॉलिबॉल खेळात जिल्ह्यात दबदबा आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने पाट हायस्कूला राज्यस्तरावर आपली वेगळी ओळख निर्माण करण्याची सुवर्ण संधी आहे.
एस. के. पाटील शिक्षण प्रसारक मंडळ पाट पंचक्रोशी च्या वतीने सर्वांना या स्पर्धेचे जाहीर निमंत्रण दिले आहे व मोठ्या संख्येने उपस्थित राहून खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचे आवाहन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!