वैभववाडीशैक्षणिकसामाजिकसिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग जि.प. सन २०१८-१९ चा उत्कृष्ट पटनोंदणी पुरस्कार उपक्रमशील शिक्षक चेतन बोडेकर यांना जाहीर..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : संजय शेळके

🎴वैभववाडी,दि.०९: सिंधुदुर्ग जिल्हा परिषद सन २०१८-१९ चा उत्कृष्ट पटनोंदणी पुरस्कार उपक्रमशील शिक्षक चेतन बोडेकर यांना जाहीर झाला आहे. पुरस्कार प्राप्त श्री. बोडेकर यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. मुलींची उत्कृष्ट पटनोंदणी पुरस्कार शिक्षणाधिकारी (प्राथमिक) श्री. आंबोकर यांनी नुकतेच जाहीर केले आहेत. विद्या मंदिर सोनाळी प्रशालेच्या शिक्षिका श्रीम. दर्शना द. सावंत व विद्या मंदिर लोरे मांजलकरवाडी प्रशालेचे शिक्षक चेतन बोडेकर यांना तालुक्यातून पुरस्कार जाहीर झाले आहेत. वैभववाडी गटशिक्षणाधिकारी मुकूंद शिनगारे यांनी पुरस्कार प्राप्त चेतन बोडेकर यांचा प्रमाणपत्र व रोख रक्कम देऊन गौरव केला. यावेळी गटसमन्वयक शिवाजी पवार, केंद्रप्रमुख गौतम तांबे, संतोष गोसावी, विजय केळकर, यशवंत वळवी, श्री. सूर्यवंशी, भीमराव तांबे व कर्मचारी उपस्थित होते.

चेतन बोडेकर वैभववाडी तालुक्यात आदर्श व उपक्रमशील शिक्षक म्हणून ओळखले जातात. कवी, गझलकार म्हणूनही त्यांनी वेगळी ओळख जिल्ह्यात निर्माण केली आहे. नुकताच त्यांचा गावय हा कवितासंग्रह प्रकाशित झाला आहे. रत्नागिरी व सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यासाठी दिला जाणारा बा.रा. कदम ज्ञानदर्शी शिक्षक पुरस्कार त्यांनी मिळविला आहे. बहुजन कर्मचारी आयोजित देश माझा या कवितेत श्री बोडेकर यांनी जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकाविला आहे. चेतन बोडेकर हे सध्या श्री रामेश्वर विद्या मंदिर एडगांव नं. 1 या प्रशालेत कार्यरत आहेत. तेजस प्रकल्पांतर्गत टॅग कॉर्डिनेटर म्हणून ते काम पाहत आहेत. कोरोनाच्या महामारीत शासन नियमांचे पालन करत ज्ञानदानाचे प्रामाणिक व नियोजनबद्ध काम ते सध्या करत आहेत. पुरस्कार मिळाल्यानंतर बोडेकर यांचे तालुक्यात सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता  कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*

*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*

*💫आमची वैशिष्ट्ये:*

*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्‍यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये  फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻‍♂️मळगाव रेल्वे स्टेशन (टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड कि.मी. अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*

*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938

*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻‍🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!