कोकणमहाराष्ट्रशैक्षणिकसावंतवाडी

गोगटे वाळके कॉलेजमध्ये चंद्रकला करंडक राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे ७ ऑक्टोबर 2023 रोजी आयोजन

*🟥गोगटे वाळके कॉलेजमध्ये चंद्रकला करंडक राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे ७ ऑक्टोबर 2023 रोजी आयोजन.*

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻 प्रतिनिधी : शैलेश गवस*

*🎴 बांदा, दि.१५:* येथील गोगटे वाळके कॉलेजमध्ये श्रीमती चंद्राबाई कल्लाप्पा म्हेत्री मेमोरियल चॅरिटेबल ट्रस्ट हलकर्णी, गडहिंग्लज आणि शिक्षण प्रसारक मंडळ बांदा संचलित गोगटे वाळके कॉलेज बांदा यांच्या संयुक्त विद्यमाने 7 ऑक्टोबर 2023 रोजी आंतर महाविद्यालयीन गट व शालेय माध्यमिक गट अशा दोन गटात राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती म्हेत्री ट्रस्टचे अध्यक्ष प्रा.डॉ.किशोर म्हेत्री व गोगटे वाळके कॉलेजचे प्राचार्य डॉ. गोविंद काजरेकर यांनी दिली.
वक्तृत्व स्पर्धेच्या माध्यमातून आजच्या विविध सामाजिक प्रश्नांवरती विचार मंथन व्हावे व वक्त्यांनी व्यासपीठावर निर्भीड व सडेतोड विचारांची मांडणी करावी यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.ही स्पर्धा मराठी भाषेत होईल.शालेय माध्यमिक गटासाठी १. आयुष्य सुंदर आहे,जगता आलेपाहिजे. .२.भारताची चांद्रयान भरारी.३. राष्ट्रभक्ती: वास्तव आणि अपेक्षा.४.वाचन संस्कृती: बदलते स्वरूप.५. आजची स्त्री: मला काय सांगायचं आहे. असे विषय देण्यात आलेले आहेत.एका स्पर्धकाला किमान सात मिनिटे व कमाल नऊ मिनिटे आपले भाषण करता येईल.या गटासाठी प्रथम पारितोषिक 4000 रुपये व सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र, द्वितीय पारितोषिक 3000 रुपये रोख सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र, तृतीय पारितोषिक 2000 रोख सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र व उत्तेजनार्थ पाचशे रुपयांची दोन पारितोषिके ठेवण्यात आली आहेत.
तर आंतर महाविद्यालयीन गटासाठी १. समान नागरी कायदा आणि सामाजिक वास्तव,२. खाजगीकरणातून बेरोजगारी संपेल काय? ३. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि देशासमोरील आव्हाने.४. राजकारणात अशी हवी तरुणाई.५. सोशल नेटवर्किंग आणि आजची युवा पिढी,असे विषय देण्यात आले आहेत.या गटासाठी एका स्पर्धकाला किमान सात मिनिटे व कमाल दहा मिनिटे वेळ देण्यात आली आहे.या गटासाठी प्रथम पारितोषिक 5000 रोख सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र, द्वितीय पारितोषिक 3000 रोख पारितोषिक आणि सन्मान चिन्ह,तृतीय पारितोषिक 2000 रोख व सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र, उत्तेजनार्थ प्रथम एक हजार रोख व प्रमाणपत्र, उत्तेजनार्थ द्वितीय रुपये पाचशे रोख व प्रमाणपत्र,अशी बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. शालेय माध्यमिक गटासाठी प्रवेश फी १००रु.व आंतर महाविद्यालयीन गटासाठी रुपये दीडशे प्रवेश फी ठेवण्यात आली आहे.प्रवेश फी स्पर्धेच्या दिवशी संयोजकांकडे भरावी.या स्पर्धे संदर्भात शालेय माध्यमिक गटासाठी अधिक माहिती करता शालेय माध्यमिक गट संयोजक प्रमुख प्रा.डॉ.एस पी. वेल्हाळ 9422576689 आणि आंतर महाविद्यालयीन गटासाठी या गटाचे संयोजक प्रमुख प्रा.आर एस गावडे 9146562979 यावर संपर्क करावा.ही स्पर्धा 7 ऑक्टोबर रोजी सकाळी गोगटे वाळके कॉलेज बांदा ता. सावंतवाडी येथे होईल.दोन्ही गटात कितीही स्पर्धक सहभागी होऊ शकतात तरी या स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी होऊन स्पर्धा यशस्वी करावी असे आवाहन ट्रस्टचे सचिव प्रा. अनिल शिर्के व स्पर्धा समन्वयक प्रा.डॉ.एन डी. कार्वेकर यांनी केले आहे.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

 

 

————————————

*🤗मुतखडा 💯% विरघळतो*
*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*
*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*

📍 *वैशिष्ठे* 📍
*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*
*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*
*🔸शरीरातील उष्णता कमी करते*
*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*

🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*
*👍एक वेळ अवश्य वापरा*

*💯% फरक नाहीतर पैसे परत*

📞 *अधिक माहिती संपर्क करा*
9145449999
📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*
https://bit.ly/3sh8qr2

___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!