शासनाने नियम डावलून सुरु असलेल्या अवैध,दगड, कॉरि क्रेशर वाल्यांवर योग्य ती कारवाई करावी…
*🟥शासनाने नियम डावलून सुरु असलेल्या अवैध,दगड, कॉरि क्रेशर वाल्यांवर योग्य ती कारवाई करावी…*
*🟥 सावंतवाडी प्रांताधिकारी प्रशांत पांनवेकर यांच्याकडे मनसे नेते माजी आमदार परशुराम उपरकर यांचे मागणी*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻 ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 सावंतवाडी, दि.15:* सावंतवाडी तालुक्यातील अनधिकृत कॉरी क्रशर वाल्यांकडून बेकायदा शासनाचे नियम डावलून मोठ्या प्रमाणावर अवैध दगड उत्कखनन सुरु असून अशा कॉरी क्रेशर वाल्यांवर योग्य ती कारवाई केली जावी तसेच मालकीच्या जमिनीत गैरकायदा ब्लास्टिंग करून दगड उतखनन करणाऱ्या संबंधित मालकाला 49 लाख रुपयांचा ठोठावलेला दंड सावंतवाडी प्रांताधिकारी यांनी माफ केला असून याबाबत पुन्हा निर्णय देऊन त्या कॉरी मालकावर योग्य ती दंडात्मक कारवाई केली जावी अशी मागणी सावंतवाडी प्रांताधिकारी प्रशांत पांनवेकर यांच्याकडे मनसे नेते माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केली.
सावंतवाडी प्रांताधिकारी पानवेकर यांची मनसे नेते परशुराम उपरकर यांनी भेट घेतली. यावेळी तालुक्यातील अनधिकृत कॉरी क्रेशर वाल्यांवर योग्य ती कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. सावंतवाडी तालुक्यात इन्सुलि वेत्ये निगुडे भागात कॉरी क्रशर जास्त प्रमाणात आहेत. या क्रशर मधून जोरदार दगड उतखनन सुरु आहे. शासनाने दिलेली मर्यादा डावलून राजरोसपणे क्रशरवाल्याकडून अवैध उतखनन सुरूच आहे. महसूल विभागाचा कोणताही अंकुश त्यांच्यावर नसून शासनाच्यां गौण खनिज नियमांचा भंग केला जात आहे. यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे याची नोंद घेण्यात यावी. बहुतांशी कॉरी क्रशर वाल्यानी अद्याप परवानगी घेतलेली नाही. निगुडे वेत्ये भागात जास्त ब्लास्टिंग केल्यामुळे ग्रामस्थांच्या भिंतीना तडे गेले आहेत त्यांची भरपाई देखील अद्याप मिळालेली नाही. निगुडे भागात मालकीच्या जमिनीत अवैध दगड उतखनन झाले होते याबाबत कॉरी मालकाला 49 लाख रुपयांचा दंड सावंतवाडी तत्कालीन तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी ठोठावला होता. कॉरी मालकाने स्वतः दिलेल्या लेखी जबाबात त्याची कबुली देखील दिली असून शासनाचा दंड भरण्याची तयारी दर्शविली होती असे असूनही अपिलात प्रांताधीकारी यांनी निकालात तब्बल 49 लाखांचा दंड माफ केला. यामुळे शासनाचे मोठे नुकसान झाले आहे. या प्रकरणाचा पुन्हा सखोल तपास केला जाऊन दोषी कॉरी क्रेशर मालकावरं कारवाई करून दंड वसुली केली जावी अशी मागणी माजी आमदार उपरकर यांनी केली. प्रांत पानवेकर यांनी या प्रकरणाचीं पुन्हा फेरतपासणी केली जाईल तलाठी मंडळ अधिकारी यांच्या मार्फत पुन्हा पंचनामा करून अहवाल तयार केला जाऊन योग्य ती कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले. यावेळी मनसे पदाधिकारी माजी शहराध्यक्ष तथा विद्यार्थीसेना जिल्हाध्यक्ष आशिष सुभेदार, प्रकाश साटेलकर, मंदार नाईक, निलेश देसाई, नंदू परब, विजय जांभळे, सुरेंद्र कोठावळे, मनोज कांबळी, स्वप्निल जाधव,अभि पेंडणेकर, रमेश शेळके सागर येडगे आदी उपस्थित होते.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

