मारहाणप्रकरणी नांदगाव सरपंचांसह आठजणांवर गुन्हा
मारहाणप्रकरणी नांदगाव सरपंचांसह आठजणांवर गुन्हा
सरपंचांच्या तक्रारीवरूनही पिता-पुत्रावर धमकी दिल्याचा गुन्हा दाखल
कणकवली
कासार्डे जाभूळवाडी येथील कमलेश सुरेश मोरये (३८, रा. नांदगाव) हे हॅ प्पी धाब्यावर जेवण करण्यासाठी गेले असता नांदगाव सरपंच रविराज उर्फ भाई मोरजकर व असलदेचे माजी सरपंच गुरुप्रसाद उर्फ पंढरी वायंगणकर यांच्यासह आठजणांनी त्यांना धमकी देत मारहाण केली. ही घटना मंगळवारी रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
दरम्यान, नांदगाव ग्रा. पं. कार्यालयात सुरेश अर्जुन मोरये व कमलेश सुरेश मोरये (दोघेही रा. नांदगाव) यांनी सरपंच व ग्रामसेवक यांना धमकी देत दंगा घातल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे.
कमलेश याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, कासार्डे- जांभूळवाडी येथील हॅप्पी धाब्यावर मंगळवारी रात्री जेवण करण्यासाठी गेले असता रविराज उर्फ भाई मोरजकर व गुरुप्रसाद उर्फ पंढरी
वायंगणकर अन्य ६ जणांनी कलमेश याला ‘तू अवैध धंदे बंद करण्याबाबत तक्रार करतो’, ‘सर्व सरकारमान्य दारुची दुकाने बंद करून दाखवू, अशी धमकी देत कमलेश यांना पाठीमागून मारहाण केली. कमलेश यांनी दिलेल्या तक्रारीनुसार नांदगाव सरपंच रविराज उर्फ भाई धोंडू मोजरकर (रा. नांदगाव), असलदेचे माजी सरपंच गुरुप्रसाद वायंगणकर (रा. असलदे), सुरेंद्र उर्फ पप्पी वायंगणकर (रा. असलदे), भूपेंद्र धोंडू मोजरकर, श्रीधर मोजरकर, कमलेश पाटील (सर्व रा. नांदगाव), कृष्णा वायंगणकर (रा. असलदे) यांचा एक कामगार या आठ जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे

