भजनी मंडळांना साहित्य पुरविण्यासाठी आज सोडत
भजनी मंडळांना साहित्य पुरविण्यासाठी आज सोडत
३ हजार २०६ अर्जातून २५० मंडळांना मिळणार लाभ
ओरोस
जिल्ह्यातील भजनी मंडळांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांना साहित्य पुरविणे या जि. प. च्या योजनेला उदंड प्रतिसाद लाभला आहे. आहे. जिल्हाभरातून ३२०६ अर्ज जि. प. कडे या योजनेच्या लाभासाठी प्राप्त झाले आहेत. यासाठी २५ लाखांची तरतूद असून २५० मंडळांना याचा लाभ दिला जाणार आहे. त्यामुळे ७ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता जि. प. च्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात याची सोडत काढली जाणार आहे.
जिल्ह्यातील भजनी मंडळांच्या कलेला प्रोत्साहन मिळावे, यासाठी प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी भजनी मंडळांना साहित्य पुरविणे ही योजना सुरू केली आहे. एक
पखवाज, एक चकी आणि पाच टाळ असे साहित्य प्रत्येक निवड झालेल्या भजनी मंडळाला दिले जाणार आहे. यासाठी २५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली
दरम्यान, या योजनेचा लाभ जिल्ह्यातील जास्तीत जास्त भजनी मंडळांनी घ्यावा, यासाठी अर्ज करण्याचे आवाहन जि. प. कडून करण्यात आले होते. त्या आवाहनाला अनुसरून आतापर्यंत जि. प. कडे ३२०६ अर्ज प्राप्त झाले आहेत. एवढ्या मंडळांना साहित्य देणे शक्य नसल्याने लकी ड्रॉ पद्धतीने मंडळांची निवड केली जाणार आहे. दरम्यान, जि. प. गटनिहाय साहित्याचा लाभ मिळावा, यासाठी त्यादृष्टीने नियोजन केले जाणार असून सुमारे २५० मंडळांना याचा लाभ दिला जाणार आहे.

