सावंतवाडीत ११ रोजी संत सेना महाराज पुण्यतिथी
सावंतवाडीत ११ रोजी संत सेना महाराज पुण्यतिथी
सावंतवाडी
सावंतवाडी तालुका नाभिक संघटना व महिला नाभिक संघटना यांच्यावतीने सावंतवाडी येथे ११ सप्टेंबरला श्री संत शिरोमणी संत सेना महाराज पुण्यतिथी उत्सव विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे. सावंतवाडी शहरातील गवळीतिठा येथील वैश्य भवन सभागृहात हा उत्सव साजरा करण्यात येणार आहे. सकाळी ९ वाजता श्री संत सेना महाराज प्रतिमेचे पूजन, आरती, भजन, तीर्थप्रसाद आदी धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. सकाळी १०.३० वाजता रक्तदान शिबीर, स्वागतगीत व महिलांसाठी पाककला स्पर्धा घेतली जाणार आहे. कोकणातील कोणताही गोड पदार्थ स्पर्धेत असावा. सकाळी ११.३० वाजता नाभिक समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते केला जाणार आहे.
दुपारी ३ वाजता अष्टविनायक दशावतार नाट्यमंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे. त्यानंतर ‘लकी डॉ काढण्यात येणार आहे. तसेच दहावी, बारावी परीक्षा उत्तीर्ण तसेच पदवीधर, शिष्यवृत्ती व कला- क्रीडा क्षेत्रात विशेष प्राविण्य मिळविलेल्या समाजातील विद्यार्थ्यांनी गुणपत्रिका झेरॉक्स १० सप्टेंबरपर्यत शांताराम वेतोरेकर (९६५७९१५२४२), सदानंद पवार यांच्याकडे सादर करावीत. तसेच सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घेणाऱ्या महिलांनी सुप्रिया चव्हाण (९४०४४४८१८७) व शामल वेंगुर्लेकर यांच्याकडे नावे नोंदवावीत. तालुक्यातील सर्व नाभिक दुकानदारांनी ११ सप्टेंबरला आपली दुकाने बंद ठेवून पुण्यतिथी उत्सवाला उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

