कोकणसामाजिकसिंधुदुर्ग

मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण..

*🟥 मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण..*

*🟥 मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या आंदोलकांवर पोलिसांनी केला लाठीचार्ज..*

*🎥 Kokan Live Breaking News*

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴जालना, दि-०२:-* जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातल्या सराटी अंतरवाली गावात मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला शुक्रवारी हिंसक वळण लागलं. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला.
यामुळे मराठा समाज आक्रमक झाला असून ठिकठिकाणी जाळपोळ तसेच वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. गावकऱ्यांनी दगडफेक केल्यानंतर आम्ही लाठीचार्ज केला असा दावा पोलिसांकडून करण्यात येत आहे..
दुसरीकडे गावकऱ्यांनी मात्र या गोष्टीचे खंडण केले असून पोलिसांनी आंदोलनस्थळी येऊन दमदाटी करत काही तरुणांना मारहाण करण्यास सुरूवात केली. त्यामुळे हे आंदोलन चिघळलं असा आरोप गावकऱ्यांकडून केला जात आहे. एकीकडे मुख्यमंत्री शिंदे यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले असताना दुसरीकडे सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडीओत अंबड तालुक्यातील सराटी अंतरवाली गावात मराठा आरक्षणासाठी शांततेत आंदोलन करताना दिसून येत आहे. यावेळी काही पोलीस आंदोलनास्थळी पोहचले. त्यांनी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल होण्याची विनंती केली.
दरम्यान, पोलीस आंदोलनस्थळी पोहचताच काही आंदोलकांनी ‘एक मराठा लाख मराठा’ अशा घोषणा देण्यास सुरूवात केली. यावेळी एका पोलीस अधिकाऱ्याने घोषणा देणाऱ्या एका आंदोलकाची कॉलर पकडली आणि त्याला खाली खेचल्याची घटना घडली.
दरम्यान, पोलीस आंदोलनस्थळी पोहचताच काही आंदोलकांनी ‘एक मराठा लाख मराठा’ अशा घोषणा देण्यास सुरूवात केली. यावेळी एका पोलीस अधिकाऱ्याने घोषणा देणाऱ्या एका आंदोलकाची कॉलर पकडली आणि त्याला खाली खेचल्याचं व्हिडीओत दिसत आहे.
पोलिसांच्या या कृत्याने आंदोलक संतापले आणि त्यांनी गोंधळ घालण्यास सुरूवात केली. त्यामुळे आंदोलनास्थळी तणावाचं वातावरण निर्माण झालं. पोलिसांनी आंदोलकांना शांत राहण्याचं आवाहन केलं.
मात्र काही आंदोलक पोलिसांच्या अंगावर धावून गेले. त्यामुळे पोलिसांनी लाठीचार्ज सुरू केल्याचं व्हिडीओत दिसतंय. दरम्यान, पोलिसांनी केलेल्या लाठीमारात महिला आंदोलकांसह अनेक आंदोलक जखमी झाले. या घटनेचे राज्यभर तीव्र पडसाद उमटत आहेत.

अनेक ठिकाणी मराठा युवक रस्त्यावर उतरला असून राज्य सरकारचा निषेध करत आहे. या पार्श्वभूमीवर आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लाठीचार्जच्या घटनेची सखोल चौकशी करून दोषी पोलिसांवर कारवाई करणार असल्याचं जाहीर केलं आहे.

*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

 

 

————————————

*🤗मुतखडा 💯% विरघळतो*
*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*
*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*

📍 *वैशिष्ठे* 📍
*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*
*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*
*🔸शरीरातील उष्णता कमी करते*
*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*

🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*
*👍एक वेळ अवश्य वापरा*

*💯% फरक नाहीतर पैसे परत*

📞 *अधिक माहिती संपर्क करा*
9145449999
📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*
https://bit.ly/3sh8qr2

___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!