गुटख्याची वाहतूक केल्याप्रकरणी स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने घेतले दोघांना ताब्यात
*🟥 गुटख्याची वाहतूक केल्याप्रकरणी स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने घेतले दोघांना ताब्यात*
*🎥 Kokan Live Breaking News*
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कणकवली, दि-०२:-* गुटख्याची वाहतूक केल्याप्रकरणी स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने दोघांना ताब्यात घेतले आहे. अभय नारायण केसरकर (वय ४३, रा. बांदा काळसेवाडी), महादेव सुभाष नेवी (वय ३३, रा. इन्सुली-डोबवाडी) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून तब्बल आठ लाख रुपये किमतीच्या बोलेरोसह साडेसात लाखाचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई आज पहाटे ओरोस येथे जिजामाता चौक परिसरात करण्यात आली.
स्थानिक अन्वेषण शाखा, सिंधुदुर्ग यांच्या पथकाला गोवा मुंबई महामार्गावरून कणकवलीच्या दिशेने पहाटे अवैध गुटख्याची बोलेरो गाडीतून वाहतूक होणार आहे, अशी माहिती मिळाल्यावरुन स्थानिक गुन्हा ‘अन्वेषण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र घाग, पोलीस उपनिरीक्षक गुरुनाथ कोयंडे, पोलीस हेडकॉन्टेबल प्रकाश कदम, प्रमोद काळसेकर, किरण देसाई, पोलीस कॉन्स्टेबल यशवंत आरमारकर, यांचे पथकाने जिजामाता चौक ओरोस या ठिकाणी सापळा रचून बोलेरो गाडी थांबवून गाडीतील २ इसमांसह सदरचे वाहन अधिक चौकशी करीता सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात आणून तिथे तपासणी केली असता, त्यामध्ये एकुण रुपये ७,५३,९८० किंमतीचा गुटखा व सुंगधित तंबाखुजन्य पदार्थ मिळून आला. सदर गाडी चालक आरोपी अभय नारायण केसरकर, (वय ४३, रा. बांदा काळसेवाडी), महादेव सुभाष नेवगी, (वय 33 रा. इन्सुली डोबवाडी) यांचे विरुध्द सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केलेला आहे. संबंधित गुन्ह्याविषयी सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनीष कोल्हटकर हे करीत आहेत.
*_………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
————————————
*प्रवेश! प्रवेश!! प्रवेश!!!*
🔳 *श्री अनंत स्मृती चॅरिटेबल ट्रस्ट कसाल संचालित*
*इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग कसाल महाविद्यालय*
⭕ *#बेसिक बी.एस.सी नर्सिंग*
( *चार वर्षांचा कोर्स*)
*#जी. एन. एम. (तीन वर्षांचा कोर्स)*
*@ *ए .एन. एम.(दोन वर्षांचा कोर्स)*
⭕ *#गावरान साडेसात एकर स्वतःच्या जागेत स्वतःच्या इमारतीत सुसज्ज नर्सिंग कॉलेज*
🔼 *#भारतीय परिचर्या परिषद दिल्ली महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक महाराष्ट्र सरकार महाराष्ट्र परिचर्या परिषद मुंबई महाराष्ट्र राज्य सुशुस्रा व परावैद्यक शिक्षण मुंबई यांची मान्यता प्राप्त असलेले नर्सिंग कॉलेज*
*#वर्ग लॅब ग्रंथालय हॉल वसतीगृह मेस मैदान आधी साऱ्या सुविधांसह सुसज्ज*
*#शंभर टक्के निकालाची परंपरा निर्माण करणारे*
🔼 *@सिंधुदुर्ग मुंबई पुणे कोल्हापूर सावंतवाडी मिरज अशा ठिकाणच्या नामांकित हॉस्पिटलमध्ये प्रात्यक्षिकांचा अनुभव असलेले नर्सिंग कॉलेज*
*@मुंबई, पुणे व कोल्हापुर सारख्या मोठ्या शहरातील नामांकीत रुग्णालयात Campus Interview द्वारे चांगल्या पगाराची हमखास नोकरी*
✨ *#आम्हाला अभिमान आहे आमचे विद्यार्थी जोडले गेलेत राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय जागतिक संस्थां मध्ये……*
🔳 *श्री अनंत स्मृती चॅरिटेबल ट्रस्ट कसाल संचलित इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग कसाल महाविद्यालय*
📞 *प्रवेशासाठी संपर्क* *7972887493/9834312805 /7499921089*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

