महाराष्ट्रसामाजिकसावंतवाडी

भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राजन तेली यांचा स्वताच्या मंत्र्यांवर विश्वास नाही म्हणूनच मोर्चे निघतात-विकास सावंत

भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राजन तेली यांचा स्वताच्या मंत्र्यांवर विश्वास नाही म्हणूनच मोर्चे निघतात-विकास सावंत

सावंतवाडी,ता.२९: भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष राहिलेल्या राजन तेलींना बहुतेक करुन आता भाजपाची ध्येयधोरणे पटत नाहीत. त्यामुळेच ते मित्रपक्षात असलेल्या मंत्री दीपक केसरकरांवर टिका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. आडाळी ते बांदा असा काढलेला लाँगमार्च हा केंद्रीय व राज्यातील उद्योगमंत्री नारायण राणे व उदय सामंताच्या विरोधात असावा, असा आपल्याला संशय आहे, असा टोला काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष तथा जेष्ठ नेते विकास सावंत यांनी आज येथे लगावला. तर आता रोजगार आणि उद्योगधंदे आणू, अशा आश्वासनाची खैरात करणाऱ्या नारायण राणेंनी इतक्या वर्षात काय केले? किती जणांना रोजगार दिला? असा सवाल जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख यांनी केला. जिल्हा काँग्रेसच्या माध्यमातून आज येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदे दरम्यान श्री. सावंत व शेख हे संयुक्तरित्या बोलत होते.

यावेळी ते म्हणाले, या ठिकाणी गेले भाजपाचे नेते असलेले श्री. तेली हे मंत्री दीपक केसरकर यांच्यावर टिका करण्याची संधी सोडत नाहीत. तर दुसरीकडे त्यांनी आपल्याच केंद्र व राज्यातील उद्योगमंत्र्यांच्या विरोधात लाँग मार्च काढला. याचा अर्थ भाजपाची ध्येयधोरणे त्यांना पटत नसल्याचे उघड होत आहे. आणि आपल्याच मंत्र्यांच्या विरोधात ते आंदोलन असावे, असा चिमटा त्यांनी काढला.
यावेळी जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख म्हणाले, दोडामार्ग येथे आयोजित
मेळाव्यात मोर्चा काढण्यापुर्वी संबंधितांनी आपल्याकडे किंवा राज्यातील तीन मंत्र्याकडे येणे गरजेचे होते. मात्र तसे झाले नाही, अशी खंत व्यक्त केली होती. याबाबत श्री. शेख म्हणाले, या ठिकाणी सत्तेत असताना राणेंनी काय केले, साधा एक रोजगार सुध्दा ते आणू ते शकले नाहीत. पंचवीस वर्षापुर्वी उषाइस्पात कंपनी आली. त्यानंतर दुर्दैवाने एकही कंपनी याठिकाणी येवू शकली नाही. आणि येथील राज्यकर्ते ते आणू शकले नाहीत हे दुर्दैव आहे,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!