महाराष्ट्र

🟥 मराठा आंदोलनं पुन्हा पेटणार, मराठा समाज आक्रमक ; पोलिसांकडून मराठा समन्वयकांना नोटिसा

🎥 Kokan Live Breaking News

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴पुणे, दि-२७:- सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द करण्याच्या निर्णय घेतला होता. त्यानंतर मराठा समाजास आरक्षण (maratha reservation ) मिळण्यासाठी समाजाने अनेक आंदोलने केली. परंतु सरकारकडून ठोस निर्णय झाला नाही. न्यायालयीन प्रक्रियेत हा निर्णय अडकणार असल्यामुळे मराठा समाजाला 50 टक्क्यांच्या आतच ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी सतत होत आहे. या मागणीसाठी मराठा समाज पुन्हा आक्रमक झाला आहे. त्यासाठी आंदोलन उभारण्यात येणार आहे. यामुळे पोलिसांनी मराठा समन्वयकांना नोटिसा दिल्या आहे.

*का दिल्या नोटिसा*
मराठा आरक्षणासाठी सरकारकडून कोणताही ठोस निर्णय अद्याप झाला नाही. यामुळे मराठा समाजाने 29 तारखेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा बंगल्यावर आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे पोलिसांनी मराठा समन्वयकांना नोटिसा दिल्या आहेत. वर्षा बंगला परिसरात आंदोलन करू नका, अशा नोटिसा मराठा समन्वयकांना मुंबई पोलिसांकडून दिल्या आहेत.

*काय आहे आंदोलकांची मागणी*
मराठा समाजाला 50 टक्क्यांच्या मर्यादेत आरक्षण देण्याची मागणी केली जात आहे. ओबीसीच्या कोट्यातून हे आरक्षण देण्याची मागणी केली जात आहे. तसेच जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत नोकरभरणी करू नका, अशी मागणी मराठा समन्वयकांनी केली आहे. त्यासाठी 29 ऑगस्टला वर्षा बंगल्याबाहेर आंदोलन करणार आहे.

*मराठा समाजाच्या इतर मागण्या*
राज्य सरकारने मराठा आरक्षणाचा प्रलंबित असलेला प्रश्न तात्काळ सोडवावा, अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे काम तात्काळ सुरू करावे, पंजाबराव देशमुख निर्वाण भत्ता आणि वस्तीगृह योजनेचा लाभ सर्वच मराठा विद्यार्थ्यांना मिळावा, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळातून मराठा समाजातील उमेदवारांना कर्ज दिले जाते, परंतु त्यासाठी अनेक जाचक अटी आहेत, त्या अटी रद्द कराव्यात, कोपर्डी प्रकरणातील आरोपींना झालेल्या फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी करावी तसेच मराठा आरक्षणाच्या आंदोलकांवर दाखल झालेले सर्व गुन्हे मागे घ्यावे, या मागण्या मराठा समाजाच्या आहेत. यासाठी समाजाकडून राज्यात अनेक वेळा आंदोलन, उपोषण करण्यात आले आहे.

*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

____________________________
__________________________________

*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*

_✨🏃🏼‍♂️🏃🏼‍♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_

▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards
▫️1BHK -14.38 Lac Onwards
▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards
▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards

🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻‍♂️*

*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*

*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9773815402
9773207862
9561253129
8652678734

*🏫पत्ता :-*
CREADAI SAWANTWADI
टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!