भाजप कार्यकर्त्यांनी मोर्चा बांधणी करावी – भाजप नेते दत्ता सामंत
*🟥 भाजप कार्यकर्त्यांनी मोर्चा बांधणी करावी – भाजप नेते दत्ता सामंत*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 कुडाळ, दि.२६:* येथील विधानसभा मतदारसंघातून निलेश राणेंना आमदार म्हणून बहुमताने निवडून आणायचे आहे. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांनी त्या दृष्टीने मोर्चेबांधणी करावी, असे आवाहन भाजप नेते दत्ता सामंत यांनी आज येथे केले. गणेश चतुर्थीच्या काळात
कुडाळ व मालवण मधील अनेक कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश
करणार असल्याचे त्यांनी सुतोवाच केले. तेंडोली येथील ठाकरे गट व
काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी आयोजित
करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.यावेळी भाजप प्रदेश सदस्य (महाराष्ट्र) दत्ता सामंत, भाजप जिल्हा उपाध्यक्ष रणजीत देसाई, ज्येष्ठ भाजप कार्यकर्ते का. स. नाईक, भाजप प्रदेश सदस्य (महाराष्ट्र) बंड्या सावंत, ओरोस मंडल अध्यक्ष दादा साईल, कुडाळ तालुकाध्यक्ष संजय वेंगुर्लेकर, भाजप जेष्ठ पदाधिकारी राजू राऊळ, रुपेश कानडे, श्रीपाद तवटे, विजय कांबळी, भाऊ पोतकर, माधवी प्रभू, दाजी गोलम, प्रसाद गावडे, तन्मय वालावलकर आदी पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्री. सामंत पुढे म्हणाले, वैभव नाईक यांचा पराभव निश्चित असून त्यामुळे ते हतबल झाले आहेत. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली देशात सर्वसामान्य वर्गासाठी अनेक योजना राबविण्यात आल्या आहेत. त्याचा नागरिकांनी फायदा घ्यावा असेही ते म्हणाले.
यावेळी भाजप उपाध्यक्ष रणजीत देसाई म्हणाले की, सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपच्या माध्यमातून विकासकामे मोठ्या प्रमाणात असून तेंडोली मतदारसंघ मात्र दुर्लक्षित राहिला. येथील विद्यमान आमदार- खासदारांनी झालेल्या कामांचे श्रेय घेतले आहे. पण जी का आता होत आहेत ती भाजपकडून होत आहेत. काम झाले की येथील आमदार-खासदार फोटो काढण्यासाठी जातात. हे सत्तेत नाहीत आणि निधी नसताना मात्र कामे कशी होतात हा प्रश्न रणजीत देसाई यांनी आमदार- खासदार यांना टोला लगावत उपस्थित केला. ज्येष्ठ भाजप कार्यकर्ते का. स. नाईक म्हणाले की, १९८५ पासून मी भाजपचा कार्यकर्ता असून त्यावेळची आणि आत्ताची परिस्थिती ही वेगळी आहे. आता भाजपमध्ये कार्यकर्ता हा पक्षाचा मुख्य घटक आहे. कार्यकर्ता असेल तरच पक्ष चालतो. त्यामुळे आपण सर्वांनी एकत्रित येऊन पक्ष वाढीसाठी प्रयत्न करावा असे ते म्हणाले. यावेळी कुडाळ तालुकाध्यक्ष संजय वेंगुर्लेकर म्हणाले की, रामचंद्र राऊळ यांच्या समवेत अनेक कार्यकर्ते भाजपमध्ये दाखल झाले असून त्यांचे आपण भाजपकडून स्वागत करतो. मोदी सरकारने मागील ९ वर्षात सर्वोत्तम काम केले असून सामान्य नागरिकांसाठी अनेक योजना राबविल्या आहेत. मोदींच्या काळात देशाची उत्तम प्रगती होत असून देश मजबूत करण्याचा प्रयत्न केंद्र सरकारकडून सुरू आहे. भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांची संख्या अधिक असून पक्ष आणखी मजबूत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला तर ओरोस मंडल अध्यक्ष दादा साईल म्हणाले की, आजच्या भाजप कार्यकर्त्या मेळाव्यात अनेक प्रवेश होत असून ही एक आनंदाची बाब आहे. येणाऱ्या काळात भाजपचा झेंडा जिल्हा परिषद आणि समितीवर फडकविणार आहोत. आपण विजयश्री खेचून आणूअसे आवाहन केले.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
————————————
*प्रवेश! प्रवेश!! प्रवेश!!!*
🔳 *श्री अनंत स्मृती चॅरिटेबल ट्रस्ट कसाल संचालित*
*इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग कसाल महाविद्यालय*
⭕ *#बेसिक बी.एस.सी नर्सिंग*
( *चार वर्षांचा कोर्स*)
*#जी. एन. एम. (तीन वर्षांचा कोर्स)*
*@ *ए .एन. एम.(दोन वर्षांचा कोर्स)*
⭕ *#गावरान साडेसात एकर स्वतःच्या जागेत स्वतःच्या इमारतीत सुसज्ज नर्सिंग कॉलेज*
🔼 *#भारतीय परिचर्या परिषद दिल्ली महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक महाराष्ट्र सरकार महाराष्ट्र परिचर्या परिषद मुंबई महाराष्ट्र राज्य सुशुस्रा व परावैद्यक शिक्षण मुंबई यांची मान्यता प्राप्त असलेले नर्सिंग कॉलेज*
*#वर्ग लॅब ग्रंथालय हॉल वसतीगृह मेस मैदान आधी साऱ्या सुविधांसह सुसज्ज*
*#शंभर टक्के निकालाची परंपरा निर्माण करणारे*
🔼 *@सिंधुदुर्ग मुंबई पुणे कोल्हापूर सावंतवाडी मिरज अशा ठिकाणच्या नामांकित हॉस्पिटलमध्ये प्रात्यक्षिकांचा अनुभव असलेले नर्सिंग कॉलेज*
*@मुंबई, पुणे व कोल्हापुर सारख्या मोठ्या शहरातील नामांकीत रुग्णालयात Campus Interview द्वारे चांगल्या पगाराची हमखास नोकरी*
✨ *#आम्हाला अभिमान आहे आमचे विद्यार्थी जोडले गेलेत राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय जागतिक संस्थां मध्ये……*
🔳 *श्री अनंत स्मृती चॅरिटेबल ट्रस्ट कसाल संचलित इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग कसाल महाविद्यालय*
📞 *प्रवेशासाठी संपर्क* *7972887493/9834312805 /7499921089*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

