कणकवलीकोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

🟥 वासुदेव उर्फ काका पाटकर यांना नगरपंचायत जुने भाजीमार्केट कणकवली, सर्व व्यापारी मित्रमंडळाने वाहिली भावपुर्ण श्रद्धांजली..

🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्युज

🔥अचुक बातमी थेट हल्ला🔥

✍️प्रतिनिधी – रविकांत मधुकर जाधव

🎴कणकवली, दि-२४ नगरपंचायत जुने भाजी मार्केटमधील पाटकर टेलरचे मालक वासुदेव उर्फ काका पाटकर यांचा १६ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास स्वर्गवासी झाले.

त्यांना भावपुर्ण श्रद्धांजली म्हणुन नगरपंचायत व्यापारी मित्रमंडळमधील कणकवली सर्व व्यापारी मित्रमंडळातर्फे २२ ऑगस्ट २०२३ रोजी श्रद्धांजली वाहण्यात आली.

काका पाटकर यांचा स्वभाव सर्वांशी मनमिळाऊ, गमतीशीर व्यक्तिमत्त्व म्हणुन ओळख. सर्वांशी हसत – खेळत बोलणारे, सर्वांना समजुन घेऊन समजुन सांगणारे असे व्यक्ती. चुकीचे असल्यास रागात बोलले, तरी तेवढ्याच प्रेमाने पुन्हा समजुन सांगणार.

काका पाटकर यांनी मार्केटमध्ये गेले ३० ते ३५ वर्षे व्यवसाय केला आणि पैशाऐवजी माणसे जोडण्याचं काम केलं. यांच्या जाण्याने सर्व व्यापारी, तसेच ग्राहक देखील हळहळ व्यक्त करतात.

काका पाटकर यांच्या पच्छात पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!