माजगाव मध्ये दुचाकीला गवारेड्याची धडक
माजगाव भाईसाहेब सावंत समाधी जवळ गवारेड्याची दुचाकीला धडक बसल्याने अपघात घडला आहे, ही घटना सायंकाळी ७.४५ सुमारास घडली,
याबाबत अधिक माहिती अशी की दुचाकीने बहीण भाऊ डॉक्टर कडे सावंतवाडीत जाऊन आल्यावर साटेली येथे जाताना माजगाव भाईसाहेब सावंत समाधी जवळअचानक गवारेडा रस्त्यावर आल्याने त्यांच्या दुचाकीला धडक बसली यामध्ये दोन्ही बहीण भाऊ जखमी झाल्या आहेत तर त्याच्या गाडीचे देखील नुकसान झाले आहे. त्या दोघाना उपचारासाठी सावंतवाडी उपजिल्हारुग्णालय येथे आणण्यात आले आहे.

