कुडाळशासकीयसामाजिकसिंधुदुर्ग

राज्य शासन तंटामुक्त मुक्त पुरस्कृत आंबेरी गावचे म्हाडगूत कुटुंब वाळीत..

▪️म्हाडगूत कुटुंब न्यायाच्या प्रतीक्षेत; प्रशासनाचे दुर्लक्ष

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : गुरुनाथ राऊळ

🎴कुडाळ,दि.०७: शेताच्या बांधावरून भांडणे होणे हे कोकणाच्या मातीत काही नवीन नाही. या भांडणांमधून आजही काही कुटुंबांना वाळीत टाकण्याचे प्रकार घडत आहेत. कुडाळ तालुक्यातील आंबेरी गावामध्ये तेजस म्हाडगूत यांच्या घरालाही गावकीच्या भांडणातून वाळीत टाकण्यात आले आहे. विशेष म्हणजे हा प्रकार ज्या गावात घडला आहे, त्या आंबेरी गावाला राज्य शासनाचा तंटामुक्तीचा पुरस्कार मिळालेला आहे. तेजस म्हाडगूत यांची वाट बंद करून त्यांना वाळीत टाकले आहे.

तेजस म्हाडगूत यांच्या घरी जाण्यासाठी मुख्य मार्गापासून ५ मिनिटाच्या अंतरावर तीन पिढ्यांपासूनची वाट आहे. ही वाट गेल्या आठ वर्षांपासून शेजारच्या जमीनदाराने बंद केली आहे. त्यामुळे त्यांना ३ किलोमीटरचा फेरामारून पर्यायी पायवाटेने घरी ये-जा करावी लागते. ही लहानशी पायवाट देखील अनेक लोकांच्या जमिनीतून जाते. पावसाळ्यात शेती सुरू झाली की, ही पायवाटही बंद होते. याबाबत तेजस म्हाडगुत यांनी ग्रामपंचायत, तंटामुक्त गाव समिती, कुडाळ तहसीलदार यांच्याकडे तक्रारी केल्या आहेत. मात्र, याची कोणीही दखल घेतली नाही. त्यांचे आई-वडील आता वृद्ध झाले आहेत. वडील सतत आजारी असतात. त्यांना अचानक डॉक्टरकडे न्यायचे असल्याने मोठी अडचण निर्माण होते, असे तेजस म्हाडगूत यांनी सांगितले.

तेजस म्हाडगूत यांचे वडील सिताराम म्हाडगूत यांनीही आपली व्यथा मांडली. जमिनदाराने आमची वाट बंद केली. त्यासोबत गावातील लोकांनीही आमच्या घरी येणे-जाणे बंद केले. आम्हाला वाळीत टाकले. आमच्या घरी पूजेला ब्राम्हण येत नाही. माझ्या विहिरीत बंदूक ठेऊन पोलिसांकरवी पकडून दिले आहे, असे सिताराम म्हाडगूत म्हणाले.

एकदा आमच्या मुलाच्या तक्रारीवरून कुडाळचे तहसीलदार ६ वर्षांपूर्वी येथे येऊन पाहणी करून गेले. पुढच्या काही दिवसात आमची ही परंपरागत वाट मोकळी करून देतो, असे सांगून गेले. मात्र, अजूनही काही झालेले नाही. आम्हाला न्याय हवा आहे, अशी मागणी तेजस यांच्या आई सौ. संध्या म्हाडगूत यांनी केली.

दरम्यान, भांडण तंटे हे कोकणच्या मेरेधारेवत (बांधावर) पोसलेले आहेत. याचा तेथील समाज जीवनावर अत्यंत खोलवर परिणाम होत आहे. तेजस म्हाडगूत यांच्यासारखी अनेक घर कुटुंबे वाळीत टाकली जातात. सरकार दप्तरी त्याची नोंद वाळीत टाकण्याच्या अर्थाने घेतली जात नाहीत. गावांतर्गत वाद म्हणून कानाडोळा केला जातो.

_*🛵😍टु-व्हिलर घ्यायची आहे कशाला चिंता???ग्राहकांचा विश्वास जिंकलेल्या टीव्हीएस कंपनीची दुचाकी खरेदी करा..🛵😍*_

*♦️आमच्या लोकप्रिय टीव्हीएस ज्युपिटर गाडीची वैशिष्ट्ये:-*

*▪️टेलिस्कोपिक सस्पेंशन*
*▪️सिंक ब्रेकिंग टेक्नोलॉजी*
*▪️12″ ट्युबलेस टायर विथ ॲलोय व्हील्स*
*💡LED हेड लॅम्प*
*🔌📱2L ग्लोव्ह बॉक्ससोबत फ्रंट मोबाइल चार्जर*
*▪️लार्ज लेग स्पेस*
*⏲️डिजिटल स्पीडोमीटर*
*🧑‍🦼आरामदायक  सीट*
*🛵मजबूत मेटल बॉडी*
*▪️21L चा मोठा युटिलिटी बॉक्स*
*🔮बुट लॅम्प*
*🚨LED टेल लॅम्प*
*⛽ 6L चा फ्युएल टॅंक बाहेरून इंधन भरण्याची सुविधा*
*🖐️5 वर्षांची इंजिन वॉरंटी*
*⛽ ETFI टेक्नोलॉजी मूळे 15% जास्त माइलेज.*
*💸 फायनान्स सुविधा उपलब्ध*
*🔁 एक्सचेंज सुविधा उपलब्ध.*

*😍🛵चला तर मग वाट कसली पाहतायआपली मनपसंत टिव्हीएस दुचाकी खरेदी करून सामील व्हा टिव्हीएस च्या आनंदी कुटुंबात…🏍️🏍️*

*🏢 संपर्क :*
*नेक्स्ट ड्राईव्ह टीव्हीएस शोरुम कुडाळ*
*📱9623440050*
*🛑 कणकवली : 7517590050*
*🛑 देवगड : 9403051451*
*🛑 मालवण : 9823781206*
*🛑 वेंगुर्ले : 9404803765*
*🛑 सावंतवाडी : 9421148555*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!