कुडासे गावचे विभाजन करू नका!
🟥सरपंच, ग्रा. पं. सदस्यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी*
🎥 Kokan Live Breaking News
✍🏻ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴 सिंधुदुर्गनगरी, दि.०७: कुडासे गावचे विभाजन कोणत्याही परिस्थितीत करू नये, अशी मागणी कुडासे गांवच्या सरपंच पूजा देसाई यांच्यासह उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
दोडामार्ग तालुक्यातील कुडासे गावचे विभाजन करून वानोशी, देवमाळा, धनगरवाडी यांचा मिळून वनोशी महसुली गाव करण्याची मागणी काही मोजक्याच लोकांनी केली होती. त्यानुसार सुनावणी झाली. परंतु त्याला सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व बहुसंख्य ग्रामस्थांनी विरोध केला. ग्रामसभेत तसे ठराव झाले. त्याप्रमाणे कुडासे गावचे विभाजन होऊ नये. यासाठी प्रारूप नोटीसही काढण्यात आली. परंतु ही नोटीस रद्द करून कुडासे गावचे विभाजन करण्याच्या मागणीसाठी गावातील ग्रामस्थ अजय श्रीकृष्ण परब यांनी उच्च न्यायालयात अपील केले. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी कुडासे गावच्या विभाजनासंदर्भात फेरसुनावणी लावलेली आहे. दरम्यान, कुडासे गावचे विभाजन झाल्यास लोकांना फार अडचणी निर्माण होणार आहेत. या संदर्भात यापूर्वीच वेळोवेळी म्हणणे मांडलेले आहे. त्या मागणीचा विचार करूनच कुडासे गावचे विभाजन होऊ नये, याची नोटीस प्रशासनाकडून काढलेली होती. प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला होता. आता पुन्हा सुनावणी घेतली गेली. तरी मागील मुद्याचा विचार करावा व सुनावणी घेताना सरपंच व सदस्यांचे म्हणणे ऐकून घ्यावे व कुडासे गावचे. विभाजन करण्याचा निर्णय कायम करावा, अशी मागणी कुडासे गावचे सरपंच सरपंच पूजा देसाई, उपसरपंच आत्माराम देसाई, ग्रामपचायत सदस्य राजाराम देसाई, प्रसाद कुडतरकर, नम्रता देसाई, भाग्यश्री राऊळ व ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी केली आहे.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
*🥳स्वप्नातलं घर ….आवाक्यातला घर🏬 ….एकच नक्षत्र रेसिडेन्सी🥳*
*🎦Kokan Live Breaking||Advertise*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
*🏬नक्षत्र रेसिडेन्सी🏬*
_सावंतवाडी_
*🏬Ready Possession Flat’s Available*
*🏃🏼♂️वेळ दवडू नका आजच आपले हक्काचे घर बुक करा*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9422054540
9422075777
*🏫पत्ता :-*
*Nakshtra Residency*
भटवाडी रोड, लक्ष्मीनारायण मंदिर,
रॉयल गार्डन शेजारी,सावंतवाडी ४१६५१०
*▪️ऑफिस पत्ता:-*
UG/35,Laxminakshtra Tower
Kudal, Dist. Sindhudurg
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

