🟥ओळखीचा फायदा घेत कारची चोरी
🎥 Kokan Live Breaking News
✍🏻ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴 सावंतवाडी, दि.०७: हॉटेल मालकांच्या ओळखीचा फायदा घेत ग्राहकाने हॉटेल मालकाची कार घेऊन फसवणूक केल्याचा प्रकार सावंतवाडीत घडला. संबंधित ग्राहकाने बनावट नाव धारण करत आपला मोबाईल बंद ठेवला आहे. आपली सुमारे दोन लाखाची फसवणूक केल्याची तक्रार हॉटेल मालक चंद्रकांत मनोहर गाड (४५, रा.सोनुर्ली, ता. सावंतवाडी) सावंतवा यांनी शनिवारी रात्री सावंतवाडी पोलीस ठाण्यात घट दिली. फसवणूक करणाऱ्याचे खरे नाव सद्दाम खुदबुद्दीन जमादार (रा. कोल्हापूर) असे आहे. तो सावंतवाडीत महेश बाबुसाहेब जाधव (रा. मुंबई) या नावाने आपली ओळख सांगत असल्याचे तक्रारदार गाड यांनी सांगितले.
सद्दाम जमादार याच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक सूरज पाटील यांनी दिली. गाड यांच्या तक्रारीनुसार, ते सावंतवाडी-सालईवाडा येथे हॉटेल ‘चालवित होते. त्यावेळी त्याच्या हॉटेलात महेश जाधव नामक व्यक्ती जेवणासाठी अधुनमधून येत असे. त्यामुळे त्याची ओळख झाली होती. या ओळखीतून सदर व्यक्ती त्यांची दुचाकी घेऊन जात पुन्हा वेळेत आणून देत होती. दीड वर्षापासून गाड यांनी हॉटेल बंद केले. ग्राहक महेश जाधव याच्याकडे गाड यांचा डीतील मोबाईल नंबर होता. २९ टना जुलैला त्याने मोबाईलवर फोन करून आपले साहेब आंबोली येथे आले आहेत. त्यांना आणण्यासाठी कारची गरज आहे. कोणाची कार असेल तर सावंतवाडी गवळीतिठा येथे घेऊन येण्यास सांगितले. त्यामुळे गाड यांनी आपल्या मित्राच्या नावावर असलेली मारुती स्विफ्ट कार घेऊन महेश जाधव याच्या स्वाधीन केली. मात्र, दोन दिवस झाले तरी जाधव हा कार घेऊन परत आला नाही. मोबाईलही स्वीच ऑफ येत होता. त्याचा शोध न लागल्याने कार चोरीस गेल्याची तक्रार गाड यांनी दिली होती.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
__________________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards
▫️1BHK -14.38 Lac Onwards
▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards
▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards
🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻♂️*
*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9773815402
9773207862
9561253129
8652678734
*🏫पत्ता :-*
CREADAI SAWANTWADI
टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

