🟥 जावळीत अवैध दारु धंद्यावर राज्य उत्पादन शुल्कचे धाडसत्र, ३७ जणांविरोधात गुन्हा
🎥 Kokan Live Breaking News
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴सातारा, दि-०४ :- राज्य उत्पादन शुल्क विभागाने मागील सहा दिवसांपासून जावळी तालुक्यातील अवैध दारु धंद्यावर धाडसत्र सुरू केले आहे. यातूनच आतापर्यंत एकूण ३७ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. तर सुमारे अडीच लाखांहून अधिक रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात यश आले आहे.
याबाबत विभागाकडून देण्यात आलेली माहिती अशी की, राज्य उत्पादन शुल्कच्या अधीक्षक किर्ती शेडगे यांच्या नेतृत्वाखाली मागील काही दिवसांपासून जावळी तालुक्यातील अवैध दारुविक्रेत्यांवर धडक कारवाईचे सत्र सुरू करण्यात आले आहे. दि. ३ आॅगस्ट रोजीही विक्रम उत्तम पवार (रा. कुडाळ), मुकेश शिवाजी नवले, सुधीर शंकर भिसे (रा. सायगाव) आणि बाबासाहेब दिनकर भिसे (रा. हुमगाव) यांच्या घरी तसेच दारु अड्यांवर धाडी टाकल्या. तसेच देशी, विदेशी दारु, बिअर असा मिळून सुमारे ४३ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
तसेच संबंधितांवर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. उत्पादन शुल्क विभागाने मागील सहा दिवसांत जावळी तालुक्यातच अवैध दारुचा पुरवठा करणारे आणि अवैध दारुधंद्यावर कारवाई करत ३७ जणांविरोधात गुन्हा नोंद केला आहे. त्यांच्या ताब्यातून दारु, बिअरचा एकूण २ लाख ५४ हजार ८७५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.
या कारवाईत निरीक्षक श्रीकांत खरात, माधव चव्हाण, दुय्यम निरीक्षक किशोर नडे, प्रतिक ढाले, सहायक दुय्यम निरीक्षक महेश मोहिते, अमोल खरात, जवान मनिष माने, अरुण जाधव, नरेंद्र कलकुटगी, किरण जंगम, आबासाहेब जानकर, महेश देवकर आदींनी सहभाग घेतला.
*_……..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
*🥳स्वप्नातलं घर ….आवाक्यातला घर🏬 ….एकच नक्षत्र रेसिडेन्सी🥳*
*🎦Kokan Live Breaking||Advertise*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
*🏬नक्षत्र रेसिडेन्सी🏬*
_सावंतवाडी_
*🏬Ready Possession Flat’s Available*
*🏃🏼♂️वेळ दवडू नका आजच आपले हक्काचे घर बुक करा*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9422054540
9422075777
*🏫पत्ता :-*
*Nakshtra Residency*
भटवाडी रोड, लक्ष्मीनारायण मंदिर,
रॉयल गार्डन शेजारी,सावंतवाडी ४१६५१०
*▪️ऑफिस पत्ता:-*
UG/35,Laxminakshtra Tower
Kudal, Dist. Sindhudurg
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

