🟥ग्लेन डिसोजा मृत्यूप्रकरणी चौकशीसाठी उपोषणाचा इशारा
🎥 Kokan Live Breaking News
✍🏻ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴 सावंतवाडी, दि.०३: येथील नगरपरिषदेच्या जिमखाना मैदान येथील स्विमिंग पूलमध्ये चराठा येथील १९ वर्षीय ग्लेन जॉन डिसोजा या मुलाचा ट्रेनर व लाईफगार्ड यांच्या हलगर्जीपणामुळे पाण्यात बुडून मृत्यू झाला. मुलाच्या मृत्यूसंदर्भात चौकशी व आरोपपत्र दाखल करण्यासंदर्भात पोलिसांकडे वेळोवेळी तक्रार अर्ज करूनही अद्याप कोणतीच दखल न घेतल्याने मृत ग्लेन याचे वडील जॉन अॅलेक्स डिसोजा यांनी न्याय हक्कासाठी १५ ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे. सदरचे निवेदन खासदार विनायक राऊत, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, जिल्हा पोलीस अधीक्षक, पोलीस ठाणे, सावंतवाडी, प्रांताधिकारी, तहसीलदार यांना दिले आहे.
जॉन डिसोजा यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, आपला मुलगा ग्लेन डिसोजा याचा ७ मे रोजी नगरपरिषदेच्या स्विमिंग पूलचे ट्रेनर व लाईफगार्डसह नगरपरिषदेचे तत्कालीन मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांच्या हलगर्जीपणामुळे पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. या प्रकरणी स्विमिंग पूलचे कंत्राटदार, ट्रेनर, लाईफगार्ड व तत्कालीन मुख्याधिकारी जावडेकर यांच्यावर गुन्हा दाखल करावा, असा तक्रार अर्ज दाखल केला होता. पोलिसांनी तपास करत फक्त या गुन्हयात स्विमिंग पूलचे कंत्राटदार व ट्रेनर यांना दोषी ठरवत त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. या प्रकरणात तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांना दोषी ठरवून गुन्हा दाखल करावा, यासाठी १५ ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
__________________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards
▫️1BHK -14.38 Lac Onwards
▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards
▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards
🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻♂️*
*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9773815402
9773207862
9561253129
8652678734
*🏫पत्ता :-*
CREADAI SAWANTWADI
टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

